Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिरायच्या बहाण्यानं साहिलनं निक्कीला गाडीत बसवलं, लग्नाचा विषय काढताचं केली तिची हत्या, मृतदेहासोबत 40 KM फिरत राहिला दिल्लीच्या रस्त्यांवर!

साहिलने चार दिवस निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. दुसरीकडे, तीन-चार दिवस निक्कीचे कुटुंबीय तिच्याशी बोलले नाहीत, तेव्हा तिने गुन्हे शाखेत उपस्थित असलेल्या तिच्या एका ओळखीच्या पोलिसांना माहिती दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 15, 2023 | 01:27 PM
फिरायच्या बहाण्यानं साहिलनं निक्कीला गाडीत बसवलं, लग्नाचा विषय काढताचं केली तिची हत्या, मृतदेहासोबत 40 KM फिरत राहिला दिल्लीच्या रस्त्यांवर!
Follow Us
Close
Follow Us:

श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांड सारखंच आणखी एक हत्या प्रकरण (Murder Case) दिल्लीत घडल्यानं पुन्हा एकदा दिल्लीचं नाव चर्चेत आलं आहे. आरोपी साहिल गहलोतने (वय,24)  निर्घृणपणे त्याच्या लिव्ह इन पार्टनर निक्की यादवची हत्या केली. पोलिसांना तिचा मृतदेह (Girl Dead Body) ढाब्याच्या फ्रीजमध्ये सापडला (Found In Dhaba Fridge) असुन आरोपी साहिलला अटक केली आहे. आता चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होत असुन साहिलने आधी निक्कीला कारमध्ये फिरायला नेलं आणि वाटेत तिचा गळा आवळून खून केल्याची बाब समोर आली आहे. एव्हढचं नव्हे तर तिचा मृतदेह गाडीच ठेवून तो दिल्लीच्या रस्त्यावर 40 किमीपर्यंत  फिरत होता, अशीही माहिती समोर आली आहे.

[read_also content=”लग्नाच्या हट्ट धरल्याने लिव्ह इन पार्टनरची हत्या; मृतदेह फ्रिजमध्ये ठेवुन गावी जाऊन केलं दुसऱ्या मुलीशी लग्न, श्रद्धा हत्याकांडपासून प्रेरणा https://www.navarashtra.com/crime/nikki-found-in-the-fridge-after-4-days-sahil-brought-the-bride-after-killing-love-wanted-to-dispose-of-the-dead-body-like-aftab-nrps-369807.html”]

कोचिंग क्लासमधे झाली मैत्री

दिल्लीतील नजफगढमधील मित्रांव गावात राहणाऱ्या साहिलची 2018 मध्ये हरियाणातील झज्जर येथील असलेल्या निक्की यादवशी कोचिंग क्लासमधे मैत्री झाली. दोघेही उत्तम नगरमध्ये कोचिंग क्लासला जात होते. या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली, आणि हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. दिल्लीतील बाबा हरिदास नगरमध्ये दोघं सोबत राहु लागले.

नेमकं काय घडलं?

सर्व काही ठीक चालले होते. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली, पण गेल्या वर्षभरापासून साहिलच्या घरच्यांनी लग्नासाठी दबाव टाकला तेव्हापासून हा त्रास सुरू झाला. साहिलच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर निक्की आणि साहिलमध्ये वाद व्हायला लागले. त्यानंतर नेहमी नेहमीच्या वादाला कंटाळुन साहिलने तिची हत्या केली. घटनेच्या दिवशी साहिलने निकीला फोन करून सांगितले की, चल कारमध्ये फिरायला जाऊ. यानंतर साहिल निक्कीसोबत कारमध्ये फिरायला गेला. जिथे वाटेत त्याने निकीचा गळा आवळून खून केला. इतकेच नाही तर साहिलने दिल्लीच्या रस्त्यावर 40 किमीपर्यंत तिचा मृतदेह ड्रायव्हरच्या सीटवर ठेवुन फिरत राहिला. यानंतर त्याने कुटुंबाच्या पसंतीच्या मुलीशी लग्नही केले. निक्कीच्या हत्येनंतर चार दिवसांनी ही घटना उघडकीस आली.

असा झाला उलगडा

निक्कीच्या हत्येनंतर साहिलने दुसरे लग्न केले. आपले रहस्य उघड होणार नाही असे त्याला वाटले. साहिलने चार दिवस निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. दुसरीकडे, तीन-चार दिवस निक्कीचे कुटुंबीयांता निक्कीशी संपर्क न झाल्याने त्यांनी गुन्हे शाखेतील त्यांच्या ओळखीच्या असलेल्या एका  पोलिसांला याबद्दल माहिती दिली. निक्कीचा फोन लोकेशनचा शोध घेतला असता ते ढाब्याजवळ असल्याच पोलिसांना आढळलं. त्यानंतर पोलिसांनी तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, यापूर्वी एका मुलीची हत्या करून मृतदेह ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, असे बोलले जात होते.

Web Title: Sahil gahlot killed his live in partner nikki yadav amid quarrel over marriage nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2023 | 01:09 PM

Topics:  

  • aftab poonawala

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.