Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded crime: नांदेडमध्ये प्रेमाचा रक्तरंजित शेवट; आंचलच्या वडील आणि भावांकडून सक्षमची निर्घृण हत्या

या घटनेनंतर आंचल मामीडवार हिच्या कृतीमुळे राज्यभरात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर आंचलने त्याच्यासोबत काही विवाहविधी पार पाडल्याचे समोर आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 30, 2025 | 02:17 PM
Nanded Crime News

Nanded Crime News

Follow Us
Close
Follow Us:
  •  नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून सक्षम ताटेची निर्घृण हत्या
  • मुलीचे आणि मुलाच्या दोघांच्याही कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी
  • महाराष्ट्रात अद्यापही समाजातील जातीभेद आणि त्यातून उसळणारी हिंसा गंभीर
Nanded crime:  नांदेडमधील मिलिंद नगर, इटवारा परिसरात सक्षम ताटे (20) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.. सक्षमचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून सक्षमची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आंचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांनी सक्षमच्या डोक्यात फरशी व दगड घालून हत्या केल्याची माहित पोलिसाच्या प्राथमिक तपासातून मिळाली आहे.

Nashik Crime: नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांचे सापडले मृतदेह, आत्महत्येचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, आंचल मामीडवार आणि सक्षम ताटे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण आंचलच्या कुटुंबियांना त्यांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. याच रागातून आंचलच्या वडील आणि दोन भावांनी मिळून सक्षमची हत्या केल्याची चर्चा आहे. सक्षमच्या हत्येची बातमी समजात आंचलदेखील सक्षमच्या घरी गेली होती. सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर आंचलने त्याच्या मृतदेहासोबतच काही विवाह विधी पार पाडले. दोघांनाही हळद लावण्यात आली. आंचलने सक्षमच्या नावाचे कुंकू लावत आपण आता सक्षमच्याच घरी राहणार असल्याचेही सांगितले. या सर्व घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे. पण त्याचवेळी या प्रकरणाने महाराष्ट्रात अद्यापही समाजातील जातीभेद आणि त्यातून उसळणारी हिंसा किती गंभीर स्वरूप धारण करू शकते, यावर नवे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

सक्षम ताटे याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला होता तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. सक्षमचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. सक्षमच्या मृतदेहाला आणि आंचलच्या अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले. यानंतर तिने म्हटले की, मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन. मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे, मला सक्षमसोबतच राहायचे आहे, असे आंचल मामीडवार हिने सांगितले.

पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार, सिमेंटच्या गट्टूनेही मारहाण; नेमकं काय घडलं?

सक्षमची हत्या माझ्या घरच्यांनीच केली; मी आयुष्यभर त्याच्यासोबतच राहीन

नांदेडमधील मिलिंद नगर, इटवारा परिसरात सक्षम ताटेच्या झालेल्या हत्येनंतर या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत स्वतःच्या कुटुंबीयांवरच गंभीर आरोप केले आहेत. आंचलने सांगितले की, “गेल्या तीन वर्षांपासून सक्षम आणि माझे प्रेमसंबंध होते. पण आमच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. जात वेगळी असल्याने ते नेहमीच विरोधात होते. वडील गजानन मामीडवार, भाऊ हिमेश आणि साहिल मामीडवार यांनी सक्षमची हत्या केली. “सक्षमवर एमपीडी होती. तो जेलमधून सुटल्यानंतर माझे घरचे त्याला संपवण्याच्या तयारीत होते. सक्षमला मारून टाकू अशा धमक्याही त्यांनी मला दिल्या होत्या. ”

आंचल म्हणाली की, आरोपींनी सक्षमला गोड बोलून इटवारा परिसरात बोलावले आणि नशा करून त्याची हत्या केली. त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी तो मेला नाही. मग फरशी आणि दगडाने त्याच्या डोक्यात प्रहार करून त्याला संपवले, सक्षम बौद्ध समाजातील होता, तर मी पद्मशाली समाजाची आहे. जातीचा भेदभावच कारणीभूत ठरला. आमचे प्रेम त्यांना कधी मान्य नव्हते. त्यांनीच सक्षमला संपवले,” असा आरोप तिने केला. पण त्याचवेळी आंचलने आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली.

Gondia : वडिलांसोबत शेतात गेली आणि काळाने घात केला! बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; गोंदिया येथील घटना

“मी सक्षमसोबतच राहणार; आमचं प्रेम जिवंत आहे”

सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळाला. त्यावेळी घडलेली दृश्ये राज्यभर चर्चेत आली. सक्षमच्या मृतदेहासह काही विवाहविधी पार पडले. दोघांना हळद लावली गेली आणि आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले. मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी मनाने कायम त्याच्यासोबतच राहीन. मी सक्षमच्या घरीच राहणार आहे. मला आयुष्यभर सक्षमसोबतच राहायचे आहे.”

Web Title: Sairat repeats in nanded saksham brutally murdered by aanchals father and brothers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:31 PM

Topics:  

  • crime news
  • nanded news

संबंधित बातम्या

भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…
1

भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…

सख्खा भाऊ पक्का वैरी ! कौटुंबिक वादातून केली सख्ख्या भावाची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…
2

सख्खा भाऊ पक्का वैरी ! कौटुंबिक वादातून केली सख्ख्या भावाची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…

पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…
3

पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…

कन्नड तालुक्यात भरदिवसा एकाची हत्या; सकाळी आठला शेतात गेला अन् नंतर…
4

कन्नड तालुक्यात भरदिवसा एकाची हत्या; सकाळी आठला शेतात गेला अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.