Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्यमेव जयते म्हणत समीर वानखेडे सीबीआय कार्यालयात हजर; काल शाहरुखसोबतची चॅट व्हायरल, आज कोणता नवा खुलासा?

यावेळी त्यांनी सत्यमेव जयते सीबीआय कार्यालयात हजरी लावली. आता या प्रकरणात आणखी नवे कोणते खुलासे होतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 20, 2023 | 11:12 AM
सत्यमेव जयते म्हणत समीर वानखेडे सीबीआय कार्यालयात हजर; काल शाहरुखसोबतची चॅट व्हायरल, आज कोणता नवा खुलासा?
Follow Us
Close
Follow Us:

आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aaryan Khan Case) रोज काही ना काही धक्कादायक बाबी समोर येत आहे. या कथित खंडणी कांडात काल समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि समीर वानखेडेची (sameer wankhede) चॅट (whatsapp chat) व्हायरल झाल्यानंतर वेगळाच ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी आता समीर वानखेडे आता सीबीआय कार्यालयात हजर झाले आहेत. यावेळी त्यांनी सत्यमेव जयते सीबीआय कार्यालयात हजरी लावली. आता या प्रकरणात आणखी नवे कोणते खुलासे होतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

[read_also content=”आर्यन खान ड्रग्स प्रकरणी मोठी बातमी! समीर वानखेडे आणि शाहरुख खानमध्ये अनेक वेळा झालं संभाषण https://www.navarashtra.com/crime/sameer-wankhede-and-shah-rukh-khan-had-many-conversations-during-aryan-khan-drug-case-nrps-401546.html”]

शाहरुख खान सोबतची चॅट व्हायरल

समीर वानखेडे आणि शाहरुख खानमध्ये अनेक वेळा संभाषण झाल्याची माहिती काल समोर आली. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. या चॅटमध्ये शाहरुख खानने लिहिले होते, भगवान के लिए अपने बंदों से कहो कि जल्दबाजी न करें..  मी शपथ घेतो की मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि तुला जे काही साध्य करायचे आहे किंवा साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे त्यात मी तुला मदत करीन. हे वचन आहे आणि ते करण्यास सक्षम असण्याइतपत तु मला चांगले ओळखता. मी तुला विनंती करतो की कृपया माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया कर. आम्ही साधी माणसं आहोत आणि माझा मुलगा थोडासा मनमौजी स्वभावाचा आहे. पण कठोर गुन्हेगाराप्रमाणे तुरुंगात डांबण्याइतका वाईट नाही. हे तुलाही माहीत आहे. मी तुला विनवणी करतो, दया कर.

समीर वानखेडेंवर कोणते आरोप

समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपये वसूल करण्याचा प्लॅन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्यन खानला आरोपी न करण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचं सांगण्यात येत आहे.  या आरोपाखाली सीबीआयने समीर वानखेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने अलीकडेच वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठासमोर दाखल केलेल्या याचिकेत सीबीआयकडे दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात आपल्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, अशी विनंतीही केली आहे. वानखेडे यांच्या अर्जावर खंडपीठाचा निर्णय येणे बाकी आहे.

नेमंक प्रकरण काय?

एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.

Web Title: Sameer wankhede present at cbi office saying satyamev jayate nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2023 | 11:12 AM

Topics:  

  • Aryan Khan
  • sameer wankhede
  • shahrukh khan

संबंधित बातम्या

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
1

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट  घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद
2

‘तुमचं वय झालंय, आता रिटायरमेंट घ्या…’, नेटकऱ्याच्या या कंमेंटवर शाहरुखने दिले जबरदस्त उत्तर, केली बोलती बंद

‘King’ च्या सेटवर अभिनेता शाहरुख खान जखमी? थांबले शूटिंग, चित्रपटाच्या सदस्याने सांगितले सत्य
3

‘King’ च्या सेटवर अभिनेता शाहरुख खान जखमी? थांबले शूटिंग, चित्रपटाच्या सदस्याने सांगितले सत्य

“सोशल मीडिया फॅन क्लब हे हिटलरच्या गोबेल्ससारखे…”, आर्यन खान प्रकरणात अडकलेल्या समीर वानखेडे यांचे मोठे विधान
4

“सोशल मीडिया फॅन क्लब हे हिटलरच्या गोबेल्ससारखे…”, आर्यन खान प्रकरणात अडकलेल्या समीर वानखेडे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.