Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

पोलीस दलातील अधिकाऱ्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 05, 2025 | 02:52 PM
Santosh Deshmukh Case: बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
Follow Us
Close
Follow Us:

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. खासदार बजरंग सोनावणे यांनी बीड पोलीस दलातील काही अधिकाऱ्यावरच आरोप करत  पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातआहे. देशमुख यांचं अपहरण जआल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यात चालढकल केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली  आणि त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती केली.

पण या  बदलीनंतरही सातत्याने गावकऱ्यांकडून पोलीस  दलातील काही अधिकाऱ्यांच्या कामावर  प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे. त्यातच  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीनी  ट्वीटच्या माध्यमातून  बीड पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या  एसआयटी कमिटीमध्ये  असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी संबंध  आहे, असा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी  काही फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले.

धक्कादायक! ‘चौकशी करणारेच PSI वाल्मिक कराडचे मित्र? जितेंद्र आव्हाडांनी थेट फोटो केले पोस्ट

या घडामोडींनंतर बीड पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्याने नियुक्त बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. महाजन यांची नियुक्ती आता नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटी कमिटीतील एक अधिकारी महेश विघ्ने हे वाल्मिक कराडचे मित्र असल्याचा दावा बजरंग सोनावणे यांनी केला आहे.महेश विघ्ने नावाच्या व्यक्तीचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो दाखवत, बजरंग सोनावणे यांनी हा आरोप केला. “मित्रच वाल्मिक कराड याची चौकशी कशी करेल?”  असा  सवाल त्यांनी उपस्थित केला,  बजरंग सोनावणे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दिवशीचा वाल्मिक कराडचा एक फोटो जयंतराव पाटील यांनी ट्वीट केला होता. या फोटोत महेश विघ्ने नावाची व्यक्ती दिसत असून, तीच व्यक्ती सध्या SIT मध्ये अधिकारी म्हणून आहे.

Kalyan: खेड्यातील ब्राह्मण कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या संरक्षणाची गरज; माधव भंडारी यांचं

सोनावणे म्हणाले, “जर हा अधिकारी आरोपीसोबत आनंद साजरा करत असेल, तर तो आरोपीची योग्य प्रकारे चौकशी कशी करेल?” बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी जबाबदार मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू.” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Web Title: Santosh deshmukh case hasty transfers of four police officers in beed police force nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Beed crime News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.