बीड हत्या प्रकरणाचे तपास करणारे पीएसआय महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांचे संबंध असल्याचे फोटो व्हायरल (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये सध्या वातावरण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. त्यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली. 09 डिसेंबर रोजी घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे तर मास्टर माईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे. त्याने सरेंडर केले असून सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. मात्र या हत्येच्या प्रकरणामध्ये शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
बीड हत्या प्रकरणामध्ये वाक्मिक कराड याचे नाव प्रमुख सुत्रधार म्हणून समोर येत होते. वाल्मिक कराड हा 20 दिवस फरार झाल्यानंतर पुण्यामध्ये सीआयईडीला शरण आला. यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेचा तपास सुरु आहे. मात्र तपास करत असलेले पीएसआय हे देखील वाल्मिक कराडचे ओळखीचे असल्याचा धक्कादायक दावा करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर थेट फोटो पोस्ट करुन धक्कादायक दावा केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन धक्कादायक दावा केला आहे. या फोटोमध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड एकत्र दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचा निकाल लागला होता. त्यादिवशी धनंजय मुंडेंच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना हा फोटो काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या फोटोवरून वाल्मिक कराड आणि पीएसआय महेश विघ्ने यांचे जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तपासाबाबत संशय घेतला जात आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडे चा कार्यकर्ता आसल्या प्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराड चा आत्यंत खास माणुस आसुन गेले १० वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय, असा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील… pic.twitter.com/5BThMPUvng
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2025
जितेंद्र आव्हाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पोस्ट केली आहे. अंजली दमानिया यांनी लिहिले आहे की, SIT निष्पक्ष चौकशी करणार? संतोष देहमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने? ह्या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? बीडचे अधिकारी बीड च्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार? आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकरवर्ती आहेत असे माध्यमांमधून कळते, असे आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत.
SIT निष्पक्ष चौकशी करणार ?
संतोष देहमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने ?
ह्या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का ?
बीड चे अधिकारी बीड च्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार ?
आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकरवर्ती आहेत असे माध्यमांमधून कळते pic.twitter.com/8PTAq1Y1Nx
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 5, 2025