Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Doctor Death case: गोपाल बदनेचा मोबाईल सापडेना; पुरावे, धागेदोरे लपवण्याचा करतोय प्रयत्न

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी प्रशांत बनकप आणि गोपाल बदणे दोघेही डॉक्टरच्या संपर्कात होते.संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वीही प्रशांत बनकरने त्यांच्याशी संवाद साधला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 28, 2025 | 02:08 PM
Satara Doctor Death case: गोपाल बदनेचा मोबाईल सापडेना; पुरावे, धागेदोरे लपवण्याचा करतोय प्रयत्न
Follow Us
Close
Follow Us:
  • डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे
  • सरेंडर होण्यापूर्वी गोपाळ बदनेने मोबाईल लपवला
  • दोन्ही आरोपींनी डॉ. मुंडे यांच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली
Satara Doctor Death case: साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी निलंबित PSI गोपाल बदने याला पोलिसांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्याची चौकशीदेखीस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली तर गोपाल बदने याने पोलिसांना सरेंडर केले. पण सरेंडर होण्यापूर्वी गोपाळ बदने ने मोबाईल लपवला असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना त्याचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. या मोबाईलमध्ये काही महत्त्वाचे पुरावे, धागेदोरे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गोपाल बदनेने सरेंडर होण्यापूर्वी त्याचा मोबाईल कुठे लपवला आहे. याबाबत त्याने कबुलीही दिली आहे. पण त्याने तो मोबाईल कुठे लपवला आहे, याबाबत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. गोपालच्या मोबाईलमध्ये असलेले मेसेज, कॉल डिटेल्स आणि महत्त्वाचे पुरावे असल्यानेच त्याने तो लपवला असावा, त्यामुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येऊ शकतात.

Thane News: धक्कादायक! मैत्रिणीशी भांडण झालं, रागाच्या भरात १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला जाळलं

दोन्ही आरोपीं महिला डॉक्टरच्या संपर्क (Phaltan Doctor Case)

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी प्रशांत बनकप आणि गोपाल बदने दोघेही डॉक्टरच्या संपर्कात होते.संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वीही प्रशांत बनकरने त्यांच्याशी संवाद साधला होता. हे डिजीटल पुराव्यांच्या माध्यमातून समोर आले आहे. या दोन्ही आरोपींनी डॉ. मुंडे यांच्या नियमित संपर्कात असल्याची कबुलीही दिली आहे. प्रशांत बनकरची पोलिस कोठडी संपली असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.मुंडे प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने   यांच्या संपर्कात होत्या. प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने या दोघांशीही डॉ. मुंडे याचे बोलणे आणि चॅटिंग सुरु होती. पण गोपाल बदणे याने पोलिसांना सरेंडर होण्यापूर्वी मोबाईल लपवला असून तो कुठे लपवलाय बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मोबाईलमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असल्याने तो पुरावे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फलटण पोलिस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असलेला पीएसआय गोपाल बदने सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वर्दीवर नसलेला गोपाल बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, अशा संशयित अधिकाऱ्याने अशा प्रकारे वागणे योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

काळीमा! तब्बल ५१,३९३ दलित महिलांवर अत्याचार, ३ गुन्ह्यांमागे १ गुन्हा घरगुती हिंसाचाराचा; अंगावर काटा आणणारे दाहक वास्तव

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली, चाकणकर म्हणाल्या, “ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. संबंधित डॉक्टर युवतीला न्याय मिळावा यासाठी मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दररोज संपर्कात राहून चौकशीची माहिती घेत आहे.”

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मृत डॉक्टर महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादाबाबत तक्रार केली होती. मात्र, आयसी कमिटीने या वादाचे समाधान करून प्रकरण मिटवले होते. आत्महत्येच्या दिवशी ती प्रशांत बनकरच्या संपर्कात होती आणि त्याला अनेक वेळा फोन केला होता, परंतु त्यादिवशी त्याचा मोबाईल बंद होता. त्या संदर्भातील सर्व कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर रिपोर्ट्स पोलिसांकडून मागविण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Satara doctor death case gopal badnes mobile phone not found attempts are being made to hide evidence and clues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Satara Crime News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.