Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Doctor Suicide Case: गोपाळ बदनेच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळच्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती; मेहबूब शेख यांचा आरोप

मृत डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये मुख्य आरोपीने तिच्यावर चार वेळी बलात्कार केल्याचे लिहून ठेवले आहे. त्याची पोलिस खात्यांतर्गत चौकशी होण्यासाठी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली आ

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 31, 2025 | 04:10 PM
Satara Doctor Suicide Case:

Satara Doctor Suicide Case:

Follow Us
Close
Follow Us:
  • डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जयकुमार गोरेंच्या जवळच्या अधिकाऱ्याची नियुक्ती
  • घनश्याम सोनावणे यांची ही नियुक्ती म्हणजे मोठा सापळा
  • म्हसवड परिसरात वैद्यकीय पुरावे बदलल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत

Satara Doctor Suicide Case: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींपैकी कोणालाही सोडले जाणार नाही,असे आश्वासन दिले आहे. या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या जवळच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार मेहबूब शेख यांनी केला आहे.

Local Body Elections: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; स्थानिक निवडणुकांसाठी खर्च मर्यादेत मोठी वाढ

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मेहबूब शेख यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. मृत डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये मुख्य आरोपीने तिच्यावर चार वेळी बलात्कार केल्याचे लिहून ठेवले आहे. त्याची पोलिस खात्यांतर्गत चौकशी होण्यासाठी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सनावणे आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी साडेचार तास गोपाल बदनेची चौकशी केल्याची माहिती आहे. पण हे घनश्याम सोनावणे हे भाजप नेते जयकुमार गोरे यांचे जवळचे सहकारी आहेत, असा आरोप मेहबूब शेख यांनी केला आहे.

फलटण डॉक्टर प्रकरणातील गोपाळ बदने यांच्या चौकशीसाठी घनश्याम सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती ‘सापळा’ असल्याचा आरोप मेहबुब शेख यांनी केला आहे. “देवाभाऊ, तुम्हाला दुसरा अधिकारी मिळाला नाही का? जयकुमार गोऱ्हे यांना भेटलेला आणि त्यांच्याशी निष्ठा दाखवणारा हाच अधिकारी या चौकशीसाठी का नेमला?” असा सवाल शेख यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे म्हटले की, “हा अधिकारी स्वतः म्हणतो — ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’. मग अशा अधिकाऱ्याला गोपाळ बदने यांच्या चौकशीसाठी नेमण्यामागे कोणते हितसंबंध आहेत?” असे सवालही शेख यांनी उपस्थित केले.

अडीच कोटींच्या देवळी ते भोरस रस्त्याचे तीनतेरा! वर्षभरातच पडले रस्त्यावर भलेमोठे खड्डे

शेख यांनी घनश्याम सोनावणे यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी असलेले संबंध तपासण्याची मागणीही केली. तसेच, “जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने नग्न फोटो पाठवल्याचे आरोप केले होते. त्या प्रकरणात घनश्याम सोनावणे यांनीच बातमी प्रकाशित करणारे पत्रकार तुषार खरात यांचे सर्व साहित्य जप्त केले होते.” याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काल वेस्टिन हॉटेलमध्ये आले होते. त्या भेटीवेळी नेमके काय ठरले, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) करण्याची मागणी केली असतानाही अजूनही एसआयटी नेमण्यात आलेली नाही, असा सवाल मेहबुब शेख यांनी उपस्थित केला आहे. म्हसवड परिसरात वैद्यकीय पुरावे बदलल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘२ जणांनी येऊन मारले अन्…’, सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणी बहीण श्वेता सिंहचे धक्कादायक वक्तव्य

डॉक्टर तरुणीच्या भावानेदेखील काही गंभीर आरोप केले आहेत. शवविच्छेदनाच्या वेळी आम्हाला मुद्दाम इतरत्र गुंतवून ठेवण्यात आले. यामुळे चौकशीची पारदर्शकता संशयास्पद असल्याचे मेहबुब शेख यांनी नमूद केले. तसेच, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक मलाही जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, “मग त्या तरुण डॉक्टरचे नेमके काय झाले?” असा थेट सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे. आता या आरोपांवर जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Satara doctor suicide case police officer close to jayakumar gore appointed to investigate the suicide of a young doctor mehboob shaikh alleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Satara Crime News

संबंधित बातम्या

Satara Doctor Death case: गोपाल बदनेचा मोबाईल सापडेना; पुरावे, धागेदोरे लपवण्याचा करतोय प्रयत्न
1

Satara Doctor Death case: गोपाल बदनेचा मोबाईल सापडेना; पुरावे, धागेदोरे लपवण्याचा करतोय प्रयत्न

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक; वडवणी गावात बंदची हाक
2

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक; वडवणी गावात बंदची हाक

Satara Doctor Death Case: फलटणच्या डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील ‘ते’ चार प्रश्न अनुत्तरित; सुषमा अंधारेंनी टाकला नवीन बॉम्ब
3

Satara Doctor Death Case: फलटणच्या डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील ‘ते’ चार प्रश्न अनुत्तरित; सुषमा अंधारेंनी टाकला नवीन बॉम्ब

Satara Doctor Death Case: “महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा..; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन आव्हाडांचा चढला पारा
4

Satara Doctor Death Case: “महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा..; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन आव्हाडांचा चढला पारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.