 
        
        चाळीसगाव अडीच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला तालुक्यातील देवळी ते भोरस या चार कि.मी.च्या रस्त्यावर खड्डे आहेत (फोटो - प्रातिनिधीक)
Jalgaon Road Condition: चाळीसगाव: अडीच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला तालुक्यातील देवळी ते भोरस या चार किलो मीटरच्या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. वर्षभरातच या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रस्त्यावरील दोन ठिकाणी असलेल्या नाल्यांवर फरशीच बसवण्यात आली नसल्याने वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
देवळी ते भोरस रस्त्याचे अंदाज पत्रकाप्रमाणे काम झालेले नाही. अडीच कोटींचा रस्ता तयार करताना साधी फरशी बसवण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यात एक प्रकारे पाण्यातच असल्याचे दिसून येते. यासंबंधी चाळीसगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील ते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या देवळी ते भोरस रस्त्याची सुधारणा करणे प्राजिमा १४३ किमी १६/२०० ते २०/६०० हा रस्ता गेल्यावर्षी तयार करण्यात आला. त्यासाठी २.५० लाख रूपये खर्च झाले.
नाशिकच्या वैष्णवी इंफ्रा. कंपनीने हे काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात या कामाचा आणि रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत.
तरवाडे, न्हावे, ढोमणे, करगाव, लांबवडगाव भागातील नागरीकांना मालेगाव, पिलखोड, देवळी, टाकळी प्र. दे. कडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत सोईचा आणि वेळेची बचत करणारा रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. त्याशिवाय देवळी, चिंचखेडे, भोरस या भागातील शेतकऱ्यांना दैनंदिन शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खाऱ्या नाल्यावर फरशी नाही…
आमदार मगेश चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून या रस्त्याचे काम गेल्या वर्षीं झाल्याने शेतकऱ्याऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी सोय झाल्याने समाधान व्यक्त होत असले तरी या रस्त्यावर खाप्य नाला व अन्य एका ठिकाणच्या नाल्यावर फरशीच बसविण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकानी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. लागत ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खाऱ्या नात्याला कायम पाणी असते. पावसाळ्यात तर पुरामुळे काही दिवस वाहतूक ठप्प पडली होती.
रस्त्याच्या गुणवत्तेबाबत बोंबाबोंब…






