Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अखेर सत्याचा विजय झाला’, न्यायालयाच्या निर्णयावर सूरज पांचोलींची प्रतिक्रिया, तर जियाच्या आईचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

जिया खान आत्महत्या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे. सूरज पांचोलीची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. पुराव्याअभावी निर्दोष सुटका केल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 28, 2023 | 03:27 PM
‘अखेर सत्याचा विजय झाला’, न्यायालयाच्या निर्णयावर सूरज पांचोलींची प्रतिक्रिया, तर जियाच्या आईचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

जिया खान आत्महत्या प्रकरणी ( Jiah Khan Suicide Case) न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला असुन अभिनेता सूरज पांचोलीची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे. पुराव्याअभावी निर्दोष सुटका केल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण आहे. या निर्णयावर सूरज पांचोलीने प्रतिक्रिया दिली असुन  ‘अखेर सत्याचा विजय झाला’ असं म्हण्टलं आहे. तर दुसरीकडे जिया खानची आई राबिया खान यांनी प्रतिक्रिया देत म्हण्टल की ‘मग माझी मुलगी हे जग सोडून कशी गेली? मी आता उच्च न्यायालयात जाणार आहे.

Actor Sooraj Pancholi acquitted of abetment charges in Jiah Khan suicide case pic.twitter.com/SUM97xLqeP

— ANI (@ANI) April 28, 2023

मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने शुक्रवारी अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली. पुराव्याअभावी निर्दोष सुटका केल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण आहे. विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी २० एप्रिल रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. याप्रकरणी आता निकाल जाहीर झाला असून, सूरज पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे.

2013 मध्ये जियानं केली आत्महत्या

जिया खान 3 जून 2013 रोजी घरात मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी 32 वर्षीय सूरज पांचोलीवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून हा खटला सुरू आहे. आता या प्रकरणावर निर्णय आल्यानंतर सिनेजगतमधुन विविध प्रतिक्रीया येत आहे.

काय म्हणाला सूरज पांचोली

सूरज पांचोलीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निकालानंतर काही मिनिटांनी त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, “अखेर सत्याचा विजय होतो.”

जिया खानची आई काय म्हणाली? 

शेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयानंतर कोर्टातून बाहेर आल्यानंतर राबिया खान (जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल) यांनी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘मी एक गोष्ट सांगतो. आजही प्रश्न पडतो की माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला? हे खुनाचे प्रकरण असल्याचे मी सुरुवातीपासूनच सांगितले आहे. आता न्यायालयाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खटला फेटाळून लावला आहे. मात्र खून कसा झाला हा प्रश्न कायम आहे. मी एक आई आहे आणि माझ्या मुलीसाठी लढणार आहे. होय, मी उच्च न्यायालयातही जाणार आहे.

#WATCH | The charge of abetment to suicide has gone. But how did my child die? This is a case of murder…will approach the high court: Rabia Khan, Jiah Khan’s mother on Sooraj Pancholi acquitted of abetment charges in suicide case pic.twitter.com/8RA7fhbPDY

— ANI (@ANI) April 28, 2023

Web Title: See sooraj pancholis reaction after the to the courts decision in jiah khan suicide case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 03:25 PM

Topics:  

  • entertainment
  • Jiah Khan Suicide Case

संबंधित बातम्या

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
1

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
2

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
3

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
4

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.