पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली जादा परतावा देण्याचे आमिषाने ज्येष्ठांची तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करणार्या टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले. विशेष म्हणजे, टोळीत वाघोलीतील विघ्नेश्वर मल्टिस्टेट को-ऑप. बँकेचा संचालक गोविंद सूर्यवंशी आणि बँकेच्या टेक्निकल विभागात काम करणारा रोहित कंबोज यांचा समावेश समोर आला आहे. टोळीने १०० ते १५० बँक खात्यांचा वापर करून देशभरात २९ सायबर गुन्हे केल्याचा छडा पोलिसांनी लावला आहे.
गोविंद संजय सूर्यवंशी (वय २२, रा. वाघोली, मूळ रा. हिंगोली), रोहित सुशील कंबोज (वय २३, रा. वाघोली, मूळ रा. पंजाब), बाबाराव ऊर्फ ओमकार भवर (वय २२, रा. वाघोली, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित (वय ४५,रा. चर्होली, मूळ रा. धारावी) आणि केतन उमेश भिवरे (वय २७, रा. खराडी), निखिल ऊर्फ किशोर जगन्नाथ सातव (वय ३२, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक संदीप कदम, तुषार भोसले यांच्यासह पथकाने केली.
पती -पत्नी देवदर्शन करून आले अन् एका व्यक्तीने त्यांच्यावर थेट…; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?
अनन्या गुप्ता नावाच्या महिलेने व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे ज्येष्ठ नागरिकांना फसवले. गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. याप्रकरणी सायबर पोलिसां गुन्हा दाखल झाला. तपासादरम्यान, १७ तारखेला वाघोलीतील एका बँक खात्यातून ५ लाख ८२ हजार रुपये चेकद्वारे काढल्याचे उघड झाले. नंतर पोलिसांनी खातेधारक केतन भिवरे याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाइल आणि बँक खात्याच्या तांत्रिक विश्लेषणातून गोविंद सूर्यवंशी, रोहित कंबोज, ओमकार भवर, जब्बरसिंह पुरोहित आणि निखिल सावंत या आरोपींचा सहभाग समोर आला. नंतर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी असंख्य बँक खात्याचा वापरकरून देशभरात अशा प्रकारे आतापर्यंत २९ गुन्हे केल्याचे समोर आले आहे. सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 26 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर; 514 ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’
सूर्यवंशी आणि कंबोज हे बी.टेक पदवीधर आहेत. त्यांच्या डिजिटल मार्केटींग कंपन्या आहेत. दहा वर्षांत १०० कंपन्या उभ्या करण्याचे त्यांचे स्वप्न होते. दोघांनी बँक खात्यांतून आलेले पैसे यूएसडीटीत रूपांतरित करून क्रिप्टो करन्सी खरेदीसाठी वापरले. आरोपींचे दुबई, गुजरात आणि पश्चिम बंगालशी संबंध असल्याचेही तपासात दिसून आले. ‘ही टोळी शंभर ते दीडशे बँक खात्यांचा वापर करून सायबर गुन्हे करत होती. त्यामुळे याप्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.