Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांची उडी; बेदम मारहाण करून केले गंभीर जखमी

मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुस्ताक आणि इस्लामुद्दीन यांची लहान मुले एकत्र खेळत होती. त्यावेळी मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 18, 2025 | 12:11 PM
लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांची उडी; बेदम मारहाण करून केले गंभीर जखमी

लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांची उडी; बेदम मारहाण करून केले गंभीर जखमी

Follow Us
Close
Follow Us:

भिवंडी : लहान मुलांच्या क्षुल्लक भांडणातून बापलेकाने आपसात संगनमताने शेजाऱ्यासह त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. शेजाऱ्याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शांतीनगर परिसरातील न्यू आझादनगर येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात बापलेकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुस्ताक अन्सारी, साहील अन्सारी अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकांची नावे आहेत. तर इस्लामुद्दीन कयामुद्दीन अन्सारी (वय ३६) असे मारहाणीत जखमी झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापलेक आणि जखमी हे एकमेकांचे शेजारी असून, ते शांतीनगर हद्दीतील न्यू आझादनगर येथील निजामी हॉटेलजवळ राहत आहेत.

मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला. बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुस्ताक आणि इस्लामुद्दीन यांची लहान मुले एकत्र खेळत होती. त्यावेळी मुलांमध्ये किरकोळ भांडणावरून वाद झाला होता. याच वादातून साहिलने इस्लामुद्दीन आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून इस्लामुद्दीनसोबत बाचाबाची करत असतानाच मुस्ताकनेही त्या ठिकाणी येऊन इस्लामुद्दीनला शिवीगाळ केली.

लोखंडी पाईपने डोक्यात वार

दरम्यान, भांडण सुरू असताना साहिलने घरातील लोखंडी पाईपने इस्लामुद्दीनच्या डोक्यात मारून मुस्ताकनेही हाताच्या ठोश्या बुक्क्यांनी मारहाण करून इस्लामुद्दीनला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात बापलेकाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा प्रकार

हिंजवडीमधील लक्ष्मी चौकाजवळ सार्वजनिक ठिकाणी तिघेजण आरडाओरडा करत असल्याने त्यांना समजवण्यासाठी हिंजवडी पोलीस गेले. त्यावेळी तिघांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शुक्रवारी (२ मे) रात्री घडली आहे.

Web Title: Seriously injured after being brutally beaten incident in bhiwandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • Bhiwandi News

संबंधित बातम्या

ठाण्यातील भिवंडीत कारखान्याला भीषण आग; अनेक साहित्य आगीत जळून खाक
1

ठाण्यातील भिवंडीत कारखान्याला भीषण आग; अनेक साहित्य आगीत जळून खाक

Crime News: मुस्कानचं शिर धडापासून वेगळं कोणी केलं? Love Marriage चा अंगावर काटा आणणारा शेवट; मुलगाही झाला पोरका
2

Crime News: मुस्कानचं शिर धडापासून वेगळं कोणी केलं? Love Marriage चा अंगावर काटा आणणारा शेवट; मुलगाही झाला पोरका

Bhiwandi :धामणकर नाका मंडळाचे यश, पोलिसांनी दिला सार्वजनिक गौरव
3

Bhiwandi :धामणकर नाका मंडळाचे यश, पोलिसांनी दिला सार्वजनिक गौरव

बीडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या डोक्यात रॉड, घटनास्थळी पोलीस उपस्थित
4

बीडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या माजी पदाधिकाऱ्याच्या डोक्यात रॉड, घटनास्थळी पोलीस उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.