bjp mla suresh dhas on shivraj diwate case in beed crime news
बीड: बीडचे आका हे सुपर पालकमंत्री आहेत. गेल्या वीस वर्षांपासून बीडमध्ये तेच पोलीस अधिकारी आहेत. या सर्वांच्या बीडच्या बाहेर बदल्या करा, वाल्मिक कराडला पळून जाण्यास ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, त्या सर्वांची नावे आणि नंबर आम्ही पोलिसांना दिले आहेत. परळी नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट व्हावं, एका एका व्यक्तीच्या नावाववर 46 -46 कोटी रुपयांची बिले उचलण्यात आली आहे, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिवसेंदिवस तापत चालल्याचे दिसत आहेत, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असतानाच सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंबाबत गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर बीडचे आका हे सुपर पालकमंत्रीच आहेत. असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
या वर्षीच्या भगवान भक्ती गडावर जो दसरा मेळावा झाला, त्यात पंकजा मुंडेंनी एक वाक्य वापरलं होतं. ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेचे पान हालत नाही, ते अण्णा म्हणजचे वाल्मिक कराड. आज जो ऑडिओ व्हायरल होत आहे. ते प्रकरण अत्यंत भयानक आहे. ते पानही धनंजय मुंडेंशिवाय हाललंय की नाही हे मला बघायचं आहे.
महानिर्मिती कंपनी ही जरी खासगी असली तरी त्याचे खासगीकरण सरकारने केले आहे. पण बेमालूमपणे कोट्यवधी रुपयांची राख उचलण्यात आली आहे. त्याचा हिशोब काढला तर त्याचे आकडेही मोजता येणार नाही. भास्कर केंद्रे सारखा पोलीस 100-100 टिप्पर ठेवतो म्हटल्यावर बाकीच्यांचे किती असतील, माझ्याकडे सगळ्यांची आकडेवारी आहे. पण माझी विनंती आहे. तुम्ही स्वत: तिथे जाऊन पाहणी करावी.
4 वर्षांत पुन्हा वैश्विक महामारी येण्याची शक्यता; या अब्जाधिशाचं भाकीत
बीडच्या नगरपालिकेचे ऑडिट 2012 ला परळीची नगरपरिषद यांच्या ताब्यात आली 2019 ते 2024 या कालावधीत 1 वर्षे 9 महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत बीडचे पालकमंत्री हे धनंजय मुंडे आहेत. त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वत:च सुपर पालकमंत्री. आता त्यांना सुपर पालकमंत्री म्हटलेलं चालेल ना, असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला. हे जिल्ह्याचे जे बाप होते. त्यांनी 11 तालुक्यांना 100 कोटी द्यायचे आणि 300 कोटी एकाच तालुक्यासाठी घेऊन जायचे. अशा पद्धतीचा कारभार बीड जि्ह्यात झाला. त्यामुळे बीडचे हे सुपर आका, सुपर पालकमंत्री या सगळ्यांनी किती पैसे खाल्ले कसे खाल्ले, म्हणून परळीच्या नगरपालिकेचे स्पेशल ऑडिट व्हावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे.