सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू (फोटो सौजन्य-X)
dress code in siddhivinayak temple in Marathi: जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलां आहे. सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी रोज हजारो भाविक येत असतात. मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी नेहमी रांगा लागलेल्या असतात. भाविकांना पावणारा गणराया म्हणून सिद्धिविनायक मंदिराची ख्याती आहे. याचपार्श्वभूमीवर ड्रेस कोड संदर्भात सिद्धीविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच एकमताने हा निर्णय घेण्यात आला. जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धीविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ज्या महिला किंवा मुली ज्या शॉर्ट्स कपड्यांमध्ये येतात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
देशभरातील सिद्धिविनायक मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी सातत्याने होत होती. त्यामुळेच सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्यापद्धतीचे मत मांडलं होतं. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
देशभरातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आधीच वस्त्र संहिता आहे. काही मंदिरांमध्ये अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, दुपट्टा, धोतर इत्यादी घालावे लागतात. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येते. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम घालण्यात आले आहे. दक्षिण भारतातील बहुतांश मंदिरात ड्रेस कोड आहे. शॉर्ट पँट, शॉर्ट कपडे घालून आलेल्या पुरुषांना व महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे न्यासकडून सांगण्यात आले आहे.
सिद्धिविनायक मंदीर हे पवित्र स्थान असल्यान त्याचं पावित्र भाविकांनी राखावं.
अंगप्रदर्शन करणारे, तोकडे कपडे घालणारे भाविक मंदिरात प्रवेश करू नयेत.
मंदिरात अशोभनीय कपडे घालणं टाळावं, भारतीय परंपरेला साजेशा कपड्यांचा समावेश असावा असंही यात म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघानं याबाबत एक प्रसिद्धीपत्रकही प्रसिद्ध केलं होतं.
पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर
रत्नागिरीतील 50 मंदिरं
जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहमदनगर या जिल्ह्यातील मंदिरं
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील मंदिरं
नागपूरच्या श्री गोपाळकृष्ण मंदिर, संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, श्री बृहस्पती मंदिर, श्री दुर्गामाता मंदिर
या मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू आहेत.