4 वर्षांत पुन्हा वैश्विक महामारी येण्याची शक्यता; या अब्जाधिशाचं भाकीत, कोरोनाची भविष्यवाणी ठरली होती खरी
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी जागतिक आरोग्यासंदर्भात मोठं भाकीत केलं आहे. येत्या ४ वर्षांत आणखी एक साथीचा आजार येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे, वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने जगाची चिंता वाढवली आहे.
भारताने पुन्हा बजावली ‘विश्वबंधुची’ भूमिका; इराकला केली ‘ही’ मोठी मानवतावादी मदत
“पुढील चार वर्षांत साथीचा आजार येण्याची शक्यता १० ते १५ टक्के आहे. बील गेट्स यावर ठामपणे आपलं मत व्यक्त केलं आहे. आपण गेल्या वेळेपेक्षा अधिक तयार आहोत, असा विचार करणं चांगलं आहे. प्रत्यक्षात मात्र आपली अजून तेवढी तयारी झालेली नाही. जगात पुन्हा एकदा कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्याशी लढण्यासाठी आपण खरोखरचं तयार नाही. जागतिक महामारी आली तर त्याच्याशी लढण्यासाठी आपण तयार नाही, असं म्हणत त्यांनी आरोग्य सुविधांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
बिल गेट्स गेल्या अनेक वर्षांपासून वैश्विक महामारीसंदर्भात सातत्याने भाष्य करत आहेत. जगातील साथीचे आजार आणि त्यापासून मानवाला असलेला धोका यासंदर्भात जनजागृती करत असतात. 2015 साली टेड टॉकमध्ये बोलताना बिल गेट्स यांनी एक वक्तव्य केले होते. त्यावेळी बिल गेट्स यांनी जग हे मोठा साथीचा आजार आल्यास तयार नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यांचं हे भाकीत खरं ठरलं, 2019 साली कोरोनाची साथ आली, या महामारीत संपूर्ण जग हादरून गेलं होतं . कोरोनाच्या महामारीत तब्बल 7 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे अशा साथीच्या आजारांशी लढण्यासाठी आपल्याकडे कोणत्या साधनांची कमतरता आहे याबाबत जगातील सर्व देशांनी एकमताने निर्णय घेतले तर अनेक अडचणी दूर होतील. मात्र, जगातील बहुतांश देश जुन्या चुकांची पुनरावृत्ती करत असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.
एलॉन मस्क यांच्या राजकीय प्रभावाने बिल गेट्स आश्चर्यचकित; म्हणाले…
मागील अनेक दिवसांपासून राज्यात गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) या दुर्मिळ आजारांचे रुग्ण आढळत आहेत. यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. GBS च्या रुग्णात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये या आजाराचे अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरात गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्येने शतक ओलांडले असून १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान या आजाराबाबत एसओपी लवकरच सादर केली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी या आजाराबाबत आढावा घेतला आहे. ६२ रुग्ण पुणे ग्रामीण, १९ रुग्ण पुणे महापालिका, १४ रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिका आणि ६ रुग्ण इतर जिल्हयातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १६ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.