crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून एका १६ वर्षाच्या विध्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा समोर आलं आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकादमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सुरक्षारक्षकच निघाला चोर, पुणे पोलिसांकडून पर्दाफाश; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त
शिक्षकाचे गैरवर्तन पीडित विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर आज पालकांनी अकॅडमीमध्ये जाऊन त्या शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.अटक केलेल्या शिक्षकाचे नाव राहुल दुबे असे आहे. तो नालासोपारा पश्चिम आयआयटीएन अकॅडमीमध्ये शिक्षक आहे.
मुंबईत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, नापास करण्याची दिली धमकी
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कांदिवली पूर्व परिसरामध्ये नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्व घडत होत. पीडित मुलगी आरोपीचा छळ निमूटपणे सहन करत होती. पण पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडल?
मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप पांडे असं या आरोपी शिक्षकाचं नाव आहे. तो कांदिवली पूर्वमधील हनुमान नगर येथील पाल राजेंद्र इंग्लिश हायस्कूलमध्ये गणित विषयाचा शिक्षक म्हणून काम करतो. आरोपी शिक्षक कुलदीप पांडे हा त्या शाळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून गणित हा विषय शिकवतो. पीडित अल्पवयीन मुलगी १५ वर्षाची असून ती दहावीच्या वर्गामध्ये शेवटच्या बेंचवर बसायची. कुलदीप पांडे वारंवार या मुलीकडे जाऊन तिला स्पर्श करायचा. तुला शिकवलेलं काही समजलं की नाही, असं विचारायचा. समजले नाही तर मला परत विचार, मी तूउला सांगेन, असे म्हणून तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. तिने या शिक्षकाला विरोध करूनही हा प्रकार सुरूच होता.
जुलै महिन्यापासून या शिक्षकाने पीडितेला अश्लील घाणेरडे मेसेज पाठवणे सुरू केले. रात्री फोन करून रात्रीच्या वेळी भेटायला बोलवत असे. तू आली नाहीस, तर तुला दहावीमध्ये नापास करून टाकीन, असे धमकावत असे. दोन-चार दिवसाअगोदर या मुलीला भेटून तू कोणाला काही सांगितलं तर मी मारून टाकेन, अशी धमकी देखील त्याने दिली होती
आरोपीला अटक
पोलिसांनी आरोपी शिक्षक कुलदीप पांडे याला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपी ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुलढाण्यातील कुख्यात गुंड बाब्याची निर्घृण हत्या, आरोपींनी चाकू खुपसला अन्…; भर रस्त्यात थरार