Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! शिक्षकाने विद्यार्थिनीला घरी बोलावलं; फोटोही मागितले अन् नंतर…

आरोपी हा हिंदी व मराठी विषय शिकवायला येत होता. तासाच्या वेळी आरोपी हा सदर अल्पवयीन मुलीच्या जवळ येऊन अंगाला हाताने स्पर्श करून बोलत असायचा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2025 | 11:51 AM
तळवडे आयटी पार्कजवळ दोघांची हत्या

तळवडे आयटी पार्कजवळ दोघांची हत्या

Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : बोराळे येथील एका माध्यमिक प्रशालेतील शिक्षकाने 17 वर्षीय विद्यार्थिनीस ‘तू माझ्या घरी ये, मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील व तुझा बोर्डात नंबर येईल’, असे म्हणून शारिरिक संबंधाची मागणी केली. नंतर घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून लगट केली. याप्रकरणी येथील माध्यमिक शिक्षक रमेश नागनाथ पाटील याच्याविरूध्द पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला.

पीडित मुलगी ही 17 वर्षांची असून, ती पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असताना सदर आरोपी हा हिंदी व मराठी विषय शिकवायला येत होता. तासाच्या वेळी आरोपी हा सदर अल्पवयीन मुलीच्या जवळ येऊन अंगाला हाताने स्पर्श करून बोलत असायचा. मात्र, यावेळी पीडिता ही लहान असल्यामुळे तिला काही समजत नसल्याने ती घरात कोणाला काही बोलली नाही. त्यानंतर सातवी व आठवी वर्गावर आरोपी शिक्षकाचा कोणताही तास नसताना अल्पवयीन मुलीस सातत्याने जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न करत असे. आरोपीने अल्पवयीन मुलीस ‘तू माइया घरी ये, आमच्या घरी कोण नसते. आपणास खुले बोलता येईल’, असे म्हणून व्हॉटसअ‍ॅपव्दारे वारंवार मेसेज केला.

तसेच फोटो पाठविण्यासही सांगितले. त्यावेळी मुलीने ‘आमचा ग्रुप फोटो आहे. माझा वैयक्तिक फोटो नाही, असे सांगितले. घरी आल्यास मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्तीचे मार्क पडतील. तुझा बोर्डात नंबर येईल व तुझे नाव होईल, असे म्हणून आरोपी शिक्षकाने मुलीकडे दोन वेळा शारिरिक संबंधाची मागणीही केली होती. 17 मार्च 2025 रोजी शेवटचा भूगोलचा पेपर दोन वाजता संपला. त्यावेळी आरोपी शिक्षकाने फोन करून पेपर कसा गेला? असे विचारून ‘आमच्या घरी तू कधी येते?’, असे विचारले.

त्यावेळी मुलीने घरी येण्यास नकार देऊन फोन कट केला. त्यानंतरही आरोपीने वारंवार फोन करून ‘घरी ये नाही तर मी तुला दहावीच्या पेपरला नापास करेन. तसेच तुझ्या लहान बहिणी आमच्या शाळेत आहेत. मी त्यांना त्रास देईन’, असे फोनवरून बोलू लागले.

त्यावेळी पीडिता घाबरून आरोपी शिक्षकाच्या घरी सायंकाळी चारच्या सुमारास गेली. त्यावेळी घरी आरोपी शिक्षक एकटाच होता. आरोपीने त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद केला व जवळ ओढून अंगाशी लगट करू लागला. चुंबनही घेऊ लागला. तेव्हा पीडिता मोठमोठ्याने ओरडू लागल्याने आरोपीने तिला सोडून दिले.

भीतीपोटी कुठंही वाच्यता नाही

भीतीपोटी पीडितेने याची कुठंही वाच्यता केली नाही. आरोपीचा नंबरही ब्लॉक केला होता. 16 एप्रिल रोजी पुन्हा आरोपीने मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली. घरातील लोकांनी व्हॅाटअ‍ॅपवर आलेले आरोपीचे मेसेज पाहिले व घडला प्रकार पीडितेने घरी सांगितला. पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आल्याचे दिलेल्या फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.

Web Title: Teacher molested student incident in mangalwedha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • Molestation of Girl
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Swami Chaitanyananda: ‘त्या’ 3 महिला, एक सिक्रेट ईमेल आणि…काय होतो चैतन्यानंदाचा ‘VVIP Game’, कसा झाला पर्दाफाश
1

Swami Chaitanyananda: ‘त्या’ 3 महिला, एक सिक्रेट ईमेल आणि…काय होतो चैतन्यानंदाचा ‘VVIP Game’, कसा झाला पर्दाफाश

Solapur Crime: कारला ‘कट’ मारल्याने जीवघेणा हल्ला, मध्यरात्री रस्त्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा खून, महिला गंभीर जखमी
2

Solapur Crime: कारला ‘कट’ मारल्याने जीवघेणा हल्ला, मध्यरात्री रस्त्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा खून, महिला गंभीर जखमी

Solapur News : हृदयद्रावक! अपघातात नातवाचा मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी आजीला हृदयविकाराचा झटका; दोघांचेही एकाचवेळी अंत्यसंस्कार
3

Solapur News : हृदयद्रावक! अपघातात नातवाचा मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी आजीला हृदयविकाराचा झटका; दोघांचेही एकाचवेळी अंत्यसंस्कार

सोलापुरात पुन्हा हिंसाचार! ‘एकच बैठक’ लावण्यावरून वाद आणि थेट कला केंद्राबाहेर गोळीबार
4

सोलापुरात पुन्हा हिंसाचार! ‘एकच बैठक’ लावण्यावरून वाद आणि थेट कला केंद्राबाहेर गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.