Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला दिला नकार; 28 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

सोलापुरात प्रेमप्रकरणातून नैराश्य आलेल्या 28 वर्षीय तरुणाने लॉजच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 01:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोलापुरातील लॉजमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला
  • गळफास घेऊन केली आत्महत्या
  • प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने जुना पुणे नाका परिसरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव हरीश भास्कर बंडी असे आहे. हरीशच्या कुटुंबियांनी त्याच्या प्रेयसीच्या घरच्यांवर आरोप केले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

काय घडलं नेमकं?

हरिषचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्या मुलीच्या घरी जाऊन लग्नाची मागणीही घातली होती. मात्र मुलीच्या वडिलांनी त्यांना दाद दिली नाही. उलट अपमानास्पद वागणूक दिल्याने हरिषने प्रचंड नैराश्यात गेला होता. बुधवारी तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

त्याने पुणे नाका येथील लॉजमध्ये 120 क्रमांकाची रूम भाड्याने घेतली होती. शनिवारी त्या रूममधून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा उघडून पहिले असता, हरिषने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याने पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास
घेतले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.

आईने केले प्रेयसीच्या कुटुंबियांवर आरोप

हरिषच्या आईला मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी मोठा हंबरडा फोडला. माध्यमांशी बोलतांना त्यांनी आरोप केला की, “माझा मुलगा फक्त त्या मुलीला भेटण्यासाठी तडफडत होता, पण तिच्या पालकांनी त्याला भेटू दिले नाही.” मुलीच्या आई-वडिलांच्या आडमुठेपणामुळेच हरिषने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला असून या मृत्यूला त्यांनाच जबाबदार धरले आहे.

या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून लॉजमधील सीसीटीव्ही (CCTV) आणि हरिषच्या मोबाईलची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

Madhyapradesh Crime: संतापजनक! विवाहित महिला व अल्पवयीन बहिणीवर मावसभाऊ-मित्राकडून अत्याचार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापुरातील एका लॉजमध्ये ही घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचे वय किती होते?

    Ans: तो सुमारे 28 वर्षांचा होता.

  • Que: आत्महत्येचे संभाव्य कारण काय मानले जाते?

    Ans: प्रेमप्रकरणातून आलेले नैराश्य हे प्राथमिक कारण मानले जात आहे.

Web Title: Solapur crime after his girlfriends family refused to consent to the marriage a 28 year old man took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
1

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
2

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार
3

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
4

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.