crime (फोटो सौजन्य : social media)
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील बॉम्बे ढाबा येथे भीषण अपघात घडला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात भिवंडीतील दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहम्मद असद अफताब आलम (रा.गैबी नगर) आणि आजम सईद अन्सारी (रा.अन्सार नगर) असे या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहे.
ठाणे हादरलं! संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची निर्घृण हत्या; मृतदेह जंगलात फेकला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद असद आफताब आलम आणि आजम सईद अन्सारी हे दोघे उशिरा रात्री भिवंडीतून मुंब्य्राकडे दुचाकीवर जात होते. त्या दरम्यान, भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खारेगाव टोलनाका येथे बॉम्बे ढाबा परिसरात भरधाव कंटेनर चालकाने दुचाकीस दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे युवक खाली पडले. यामुळे दोघांच्या डोक्यास जबर मार लागल्याने दोघे गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच या जखमींना तातडीने कालवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जबर मार बसल्याने तेथे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केले. धडक दिल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या फरार चालकाचा शोध घेत आहेत.
HIT AND RUN: मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव:जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार समोर आला आहे. यात दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना महाबळ परिसरात घडली आहे. भरधाव कारणे एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव वंदना सुनील गुजराथी आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे हादरलं! संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची निर्घृण हत्या; मृतदेह जंगलात फेकला