Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; राजेंद्र खेडेकरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी राजेंद्र बबनराव खेडेकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2026 | 06:52 PM
पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; राजेंद्र खेडेकरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; राजेंद्र खेडेकरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी राजेंद्र बबनराव खेडेकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कथित भरती गैरव्यवहार प्रकरणात सहभागी आरोपींनी चौदाहून अधिक व्यक्तींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास पावणेतीन कोटींहून अधिक रक्कम लाटल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

‘या आरोपांवरून नोकर भरतीचा सुनियोजित घोटाळा उघडकीस येत असून, पुणे महापालिकेत नोकरीचे खोटे आश्वासन देऊन बेरोजगार तरुणांकडून मोठी रक्कम लाटली आहे. हा गुन्हा मोठ्या संघटित कटाचा भाग असून, त्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे; तसेच अनेक बेरोजगार व्यक्तींचे आर्थिक नुकसान झाले आहे. आरोपांचे स्वरूप व गांभीर्य, आरोपींचा प्राथमिक सहभाग व भूमिका, तपासाची सद्यःस्थिती आणि व्याप्ती व आरोपीच्या पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यकता लक्षात घेता त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही,’ असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. शर्मा आणि एस. आर. पवार यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात हे आदेश दिले.

याप्रकरणात जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र खेडेकर याच्याविरोधात भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे भरती गैरव्यवहार प्रकरण मार्च २०२२ पासून सुरू असून, आरोपींनी बेरोजगारांना पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यांनी आपसांत संगनमत करून महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून बोगस नियुक्तीपत्रे तयार केली. त्यांनी उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही दिल्या; इतकेच नव्हे तर उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचे दाखविले, असे तक्रारींमध्ये नमूद आहे.

आरोपीचा गुन्हा सुनियोजित नोकरभरती घोटाळ्याशी संबंधित असून, आरोपींनी संगनमताने नोकरीचे आश्वासन देत बेरोजगारांकडून धनादेश, ऑनलाइन आणि रोख स्वरुपात रक्कम स्वीकारून त्यांना बनावट नियुक्तीपत्रे दिली. त्यासाठी बनावट लेटरहेड व शिक्के कोठून तयार केले, याचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी संघटितपणे फसवणुकीचे रॅकेट चालविले असून, त्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे  असा युक्तिवाद सरकारी वकील चंद्रकिरण साळवी आणि वामन कोळी यांनी केला. न्यायालयांनी तो ग्राह्य धरत आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले.

हे सुद्धा वाचा : आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी विचारांना खतपाणी घालणे खपवून घेतले जाणार नाही; भाजपच्या आमदाराचा दिपकेंना इशारा

न्यायालयाची निरीक्षणे

  • आरोपीने अनेक पीडितांकडून कोट्यवधींची रक्कम गोळा केली असून, हा मोठ्या संघटित कटाचा भाग आहे.
  • प्रत्यक्ष रोजगार भासविण्यासाठी तक्रारदाराच्या बँक खात्यात वेळोवेळी पगाराची रक्कम जमा केली जात होती, यातून फसवणुकीची सुनियोजित कार्यपद्धती दिसते.
  • संघटित आर्थिक गुन्हे आणि गुन्हेगारी कटाच्या प्रकरणात आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी आवश्यक आहे.

Web Title: The court rejected rajendra khedekars anticipatory bail application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
1

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
2

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
3

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
4

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.