सौजन्य - नवराष्ट्र टीम
ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक आणि डीजे मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि बसवराज तेली यांनी ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
कुठे किती गुन्हे?
| पोलीस ठाणे | गुन्हे |
|---|---|
| निगडी | ४ |
| बावधन | ३ |
| पिंपरी | १ |
| संत तुकाराम नगर | १ |
| दापोडी | १ |
| हिंजवडी | १ |
| वाकड | १ |
| काळेवाडी | १ |
| भोसरी | १ |
| दिघी | १ |
| चाकण दक्षिण | १ |
| एकूण | १६ |
मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, आगामी सण-उत्सवांमध्येही ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून डीजे वाजविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच!
गणेशोत्सवातील तीव्र आवाजाच्या डीजेचा वाद सुरू असतानाच शहरात वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने लावलेल्या साऊंड सिस्टीमच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्तच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, गेल्या आठ महिन्यात पुणे पोलिसांकडे तब्बल १४ हजार ३९२ कॉल्स आवाजासंदंर्भात आले आहेत. दरम्यान, या आठ महिन्यातच ध्वनी प्रदूषणाबाबत शहरात ४१३ गुन्हे नोंदवले आहेत. पुणे शहरात वर्षभर सण, उत्सव, मिरवणुका, खासगी पार्ट्या तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो. मात्र, निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे आणि ध्वनिक्षेपक वाजविल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याच त्रासातून पुणेकरांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह विविध माध्यमातून तक्रारी केल्या आहेत.






