
केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने 'मिसळ' खाल्ली अन्...
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्याप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर न्यायालयात सर्वसमावेशक आणि विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासातून अत्यंत धक्कादायक आणि कटकारस्थानाची माहिती समोर आली असून, या गुन्ह्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्टशीटमधून एक फोटो समोर आला आहे. राजस्थानमधील घाटूश्याम मंदिरातील हा फोटो होता. तसेच आरोपी चेतनचा खरा चेहरा पोलिसांना मिसळच्या हॉटेलमध्ये दिसून आला आहे.
केतनच्या हत्येनंतर चेतनने हॉटेलवर मिसळ खाल्ली
केतन अग्रवालचा मृत्यू झाल्यानंतर सिया गोयल तिथंच किल्ल्यावर ओरडत राहिली अन् चेतनने कुणाला खबर न लागू देता किल्ल्यावरून खाली उतरला. खाली उतरल्यावर त्याने आपली बाईक काढली अन् जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये आला. त्या हॉटेलमध्ये आल्यावर त्याने मिसळ ऑर्डर केली अन् खाल्ली. याच हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पोलिसांना स्पष्टपणे दिसून आला. किल्ल्यापासून ते हॉटेलपर्यंत चेतनचा चेहरा पोलिसांनी कुटल्याच सीसीटीव्हीमध्ये दिसलाच नव्हता. किल्ल्यावरचे सीसीटीव्ही फुटेज आणि त्यानंतरचे फुटेज एकत्र तपासताना पोलिसांना त्याच्या हालचालींची साखळी जोडता आली अन् पोलिसांचा चेतनवर संशय ओढावला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. अशातच सिया आणि चेतनने आधीच लग्न केलं होतं, असा संशय देखील व्यक्त केला जातोय.
खाटूश्याम मंदिरात लग्न केल्याचा संशय
सिया आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्तपणे लग्न केल्याचं देखील समोर आलंय. डिसेंबर 2025 मध्ये दोघे काही मित्रांसोबत राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी खाटूश्याम मंदिरात लग्न केल्याचा संशय पोलिसांना त्यांच्या मोबाइलमधील चॅटिंगमधून व्यक्त केला जातोय. एवढंच नाही तर सिया आणि चेतनच्या लग्नाचा एक फोटो देखील हाती लागला असून चेतनच्या गळ्यात फुलांचा हार आणि सियाच्या कपाळावर सिंदूर दिसून आलं होतं. त्याचा फोटो देखील चार्टशीटमध्ये आहे.
केतनच्या अचानक आणि अकाली निधनाचा तीव्र धक्का त्याच्या वृद्ध आजोबांना सहन झाला नाही, आणि शोकाकुल वातावरणात त्यांनीही आपले प्राण सोडले. एका तरुण आणि यशस्वी उद्योजकाच्या हत्येमुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे सुद्धा वाचा : शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात