
बायकोला धक्का दिल्यावरून वाद; एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
पिंपरी : राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बायकोला धक्का दिल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे.
ही घटना शुक्रवार (३१ नोव्हेंबर) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हिंजवडी, मुकाईनगर येथील रोणीत पीजी बिल्डिंग समोर घडली आहे. या प्रकरणी गौतम बारकुजी सरोदे (३०, मुकाईनगर हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रावाराम मंगलाराम देवासी, लाखाराम देवासी आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रावाराम याने फिर्यादी गौतम यांना बोलावून घेऊन त्याच्या बायकोला धक्का का दिला, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपी रावाराम, त्याचा भाऊ लाखाराम आणि अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाठीवर, पायावर, डोक्याच्या पाठीमागे आणि मानेवर मारहाण करून त्यांना जखमी केले. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला
पिंपरी शहरातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात शनिवारी दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून एका १८ वर्षीय तरुणीवर चॉपरने वार करून तिला गंभीर जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यात मुलीचा प्रियकरही आहे. ही घटना हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात तरुणीच्या हाताला, तोंडाला आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या असून, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले आहे. हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करत आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपासात हल्ल्याचे कारण ‘प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद’ असल्याचे स्पष्ट केले आहे.