Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीला गेले, गळ्यात सोनसाखळी घातली अन् थेट…

पुण्याच्या मध्यभागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराकडून ‘ड्रग्ज’साठा पकडला आहे. १४ लाख ६० हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 30, 2024 | 07:04 PM
Pune Crime News: ज्वेलर्सच्या दुकानात खरेदीला गेले, गळ्यात सोनसाखळी घातली अन् थेट…
Follow Us
Close
Follow Us:
पुणे: शहरात सराफी दुकानात खरेदीच्या निमित्ताने येऊन दागिने चोरीच्या घटना वाढीस लागल्या असून, सिंहगड रोड येथे पुन्हा दोन घटना घडल्या आहेत.  धायरी येथील ओम ज्वेलर्स आणि वडगाव बुद्रुक येथील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात या घटना घडल्या आहेत. चोरटे दुकानात आले आणि सोन साखळी पाहण्यास मागून त्या गळ्यात घालून दुचाकीवर धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत दिपक वसंत पवार (32, रा. दिपाली अपार्टमेंट, शाश्वत नगर, नर्‍हे) यांनी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावेळी चोरट्याने 1 लाख 18 हजार रूपये किंमतीच्या दोन सोनसाखळ्या चोरी करून नेल्या.

घटनेच्या दिवशी एक जण ओम ज्वेलर्स दुकानात शिरला. त्याने वाढदिवस 30 तारखेला असल्याचे सांगून सोनसाखळी खरेदी करायची असल्याचे दुकानदाराला सांगितले. यावेळी दुकानदार सोनसाखळी दाखवत असताना त्याने दोन्ही सोनसाखळ्या गळ्यात घालून आरशात पाहत होता. मात्र काही समजण्या आदोगरच तो दुकानाच्या बाहेर पडला व बाहेर लावलेल्या ज्युपीटर दुचाकीवर त्याने धूम ठोकली.

दुसर्‍या गुन्ह्यात अशोक बन्सीलाल पटेल (26, रा. श्रीगंगा गॅलेक्सी, वडगाव बुद्रुक) यांचे सिंहगडरोड येथील वडगाव बुद्रुक परिसरात ज्योर्तीलिंग अपार्टमेंट येथे भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानातही एकजण शिरला त्याने दुकानदाराला सोनसाखळी पाहण्यास मागितली. यावेळी दुकानात चहा देणार्‍या मुलगाही होता. चोरटा यावेळी सोनसाखळी घालून आरशात पाहत असताना चहा देणार्‍या मुलाने बाहेर कोणाची तरी गाडी सुरू आहे असे सांगितले. त्यावर चोरटा गाडी बंद करण्याच्या बहाण्याने सोनसाखळीसह बाहेर आला. अन त्याने दुचाकीवर काही समजण्यापूर्वी धुम ठोकली.

१४ लाखांचे मेफेड्रोन जप्त; पिस्तूल आणि काडतूसेही जप्त

पुण्याच्या मध्यभागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराकडून ‘ड्रग्ज’साठा पकडला आहे. १४ लाख ६० हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला असून, त्यासोबतच एक पिस्तूल आणि दोन काडतूसे जप्त केली आहेत. धक्कादायक म्हणजे, सराईताने “गेम” करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Drugs Seized: पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त; पिस्तूल आणि काडतूसेही जप्त

बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तोसिम ऊफ लडडु रहिम खान (वय ३२, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Thieves enter jwellers shop and theft gold chain dhayri and vadgaon area sinhgad police pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 07:04 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
1

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
2

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
3

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात
4

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.