Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Metro Stations Renaming: राज्यातील मेट्रो स्थानकांचे होणार नामांतर, राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन

Maharashtra Metro Stations Renaming: मेट्रो स्थानकांना नावे देताना केवळ नामांतरावर भर न देता संबंधित परिसराची ओळख आणि ऐतिहासिक वारसा जपण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 19, 2026 | 02:29 PM
Maharashtra Metro Stations Renaming, Mumbai Pune Nagpur Metro Name Change,

Maharashtra Metro Stations Renaming, Mumbai Pune Nagpur Metro Name Change,

Follow Us
Follow Us:
  • मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांमधील काही मेट्रो स्थानकांची नावे बदलली जाणार
  • नामांतरासाठी परिसराची ओळख आणि ऐतिहासिक वारसा जपण्याला प्राधान्य
  • राजकीय किंवा धार्मिक वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी विशेष खबरदारी
Maha Metro stations Renaming:  राज्यातील काही मेट्रो स्थानकांची नावे बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमधील मेट्रो स्थानकांच्या नावे बदलली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात या तीनही शहरांमधील काही मेट्रो स्थानकांची नावे बदललेली पाहायला मिळू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे यासमितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम करतील.या समितीत संबंधित भागातील खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. तसेच, संबंधित शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवणाऱ्या संस्थांचे प्रशासकीय प्रमुख या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार

मेट्रो स्थानकांना नावे देताना केवळ नामांतरावर भर न देता संबंधित परिसराची ओळख आणि ऐतिहासिक वारसा जपण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी त्या भागाचे सांस्कृतिक महत्त्व, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भौगोलिक वैशिष्ट्ये विचारात घेतली जाणार आहेत. तसेच स्थानिक नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या सूचनांनाही महत्त्व दिले जाणार आहे.

स्थानकांची नावे सर्वसामान्यांना सहज समजणारी आणि उच्चारायला सोपी असावीत, याचीही काळजी घेतली जाणार आहे. एकाच नावामुळे वेगवेगळ्या ठिकाणांबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल. नामकरण प्रक्रियेतून राजकीय किंवा धार्मिक वाद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत.

Mumbai Local: लोकलमधील विचित्र प्रकार समोर! गोरेगाव स्थानकात महिला मोटरमन केबिनच्या दरवाज्यावर

मेट्रो स्थानकांच्या नामकरणाची प्रक्रिया कशी असेल?

या प्रक्रियेत सर्वप्रथम मेट्रो व्यवस्थापन संस्था संबंधित स्थानकांच्या नामकरणाबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करणार आहे. त्यानंतर नगरविकास विभाग हा प्रस्ताव समितीसमोर मांडेल. समिती प्रस्तावाचा अभ्यास करून योग्य नावांबाबत केंद्र सरकारला शिफारस करेल. त्यानंतर अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

दरम्यान, सध्या कोणत्या मेट्रो स्थानकांची नावे बदलली जाणार, याबाबत कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. समितीच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच स्थानकांच्या नामकरणाबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Maharashtra metro stations renaming committee cm devendra fadnavis as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Metro Station
  • Mumbai
  • Nagpur
  • Pune

संबंधित बातम्या

Mumbai Local: लोकलमधील विचित्र प्रकार समोर! गोरेगाव स्थानकात महिला मोटरमन केबिनच्या दरवाज्यावर उभी राहिली अन्… Video Viral
1

Mumbai Local: लोकलमधील विचित्र प्रकार समोर! गोरेगाव स्थानकात महिला मोटरमन केबिनच्या दरवाज्यावर उभी राहिली अन्… Video Viral

Wadia Maternity Hospital: केट मिडलटन यांची मुंबईतील वाडिया प्रसूतिगृहाला भेट; डॉक्टर, नवमाता आणि कुटुंबीयांशी साधला संवाद
2

Wadia Maternity Hospital: केट मिडलटन यांची मुंबईतील वाडिया प्रसूतिगृहाला भेट; डॉक्टर, नवमाता आणि कुटुंबीयांशी साधला संवाद

Nagpur News: महाराष्ट्रात अद्ययावत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; रुग्णवाहिकेतच मिळणार ICU आणि डॉक्टरांची सुविधा
3

Nagpur News: महाराष्ट्रात अद्ययावत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; रुग्णवाहिकेतच मिळणार ICU आणि डॉक्टरांची सुविधा

Anil Agarwal Donation : मुंबईत विद्यार्थिनींसाठी वसतिगृह; अनिल अग्रवाल यांचे ५ कोटींचे योगदान
4

Anil Agarwal Donation : मुंबईत विद्यार्थिनींसाठी वसतिगृह; अनिल अग्रवाल यांचे ५ कोटींचे योगदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.