Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Acciend News: दर्शनावरून परतताना काळाचा घाला; किनवटजवळ भरधाव जीप झाडावर आदळली, चौघांचा मृत्यू, सहा गंभीर

नांदेड मधील किनवटजवळून श्रावण मासानिमित्त दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा मोठा अपघात झाला. असून भरधाव जीप झाडावर आदळल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 01, 2026 | 12:04 PM
दर्शनावरून परतताना काळाचा घाला; किनवटजवळ भरधाव जीप झाडावर आदळली, चौघांचा मृत्यू, सहा गंभीर

दर्शनावरून परतताना काळाचा घाला; किनवटजवळ भरधाव जीप झाडावर आदळली, चौघांचा मृत्यू, सहा गंभीर

Follow Us
Follow Us:
  • दर्शनावरून परततानारी भाविकांची जीप किनवटजवळ झाडावर आदळली
  • अपघातात सहा भाविक गंभीर जखमी असून,उपचारासाठी रुग्णालयात दाखल
  • प्राथमिक अंदाजानुसार जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील काही भाविक श्रावण मासानिमित्त महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणातील पारडी  गावाकडे परतत होते. त्याच वेळी भाविकांच्या जीपला सोमवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास किनवट तालुक्यातील दिपला नाईक तांड्याजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या झाडावर आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले.

महादेवाच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील पारडी (बी) गावातील भाविक श्रावण मासानिमित्त किनवट तालुक्यातील कैलास टेकडी आणि सहस्रकुंड येथील महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपल्यानंतर हे भाविक जीपमधून आपल्या गावाकडे परतत होते. परतीच्या प्रवासादरम्यान दिपला नाईक तांड्याजवळ जीपचा भीषण अपघात झाला.

हेही वाचा: Accident News: समृद्धी महामार्ग भीषण अपघात; ट्रॅव्हल्स-कंटेनरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

झाडावर जोरात आदळली जीप

सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जीप अचानक रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडक एवढी भीषण होती की जीपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीपमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मदत केली.

अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, सहा गंभीर जखमी

या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले. जखमींना स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या अपघातामुळे पारडी (बी) गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: लखनऊ: ड्रायव्हरच निघाला हत्यारा,साथीदारांसह पीडित व्यक्तीवर झाडल्या गोळ्या .; जमिनीच्या वादातून केली हिंदुत्ववादी नेत्याची हत्या

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त जीपचा पंचनामा करून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास केला जात आहे. रस्त्याची स्थिती, वाहनाचा वेग आणि इतर बाबींचाही तपास करण्यात येत आहे.  श्रावण मासानिमित्त महादेवाचे दर्शन घेऊन आनंदाने परतणाऱ्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

Web Title: Tragedy strikes on the return journey speeding jeep crashes into a tree near kinwatfour dead six critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.