Crime News: तासगावमध्ये धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या; कारण जाणून व्हाल थक्क...
या प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येळावी येथील जुना धनगाव रस्त्यालगत मयत दिपक जयसिंग सुवासे यांचे व विश्वजित मोहिते आणि इंद्रजित मोहिते यांची शेजारी-शेजारी घरे आहेत. सुवासे व मोहिते या दोन्ही कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून जमीन, गटारीचे पाणी दारातून जाणे या कारणांवरून वाद होत होता. याच वादातून अनेक वेळा वादवादीचे आणि भांडणाचे प्रकार घडले आहेत. शनिवारी दीपावली पाडव्याच्या दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास इंद्रजित व विश्वजित हे दोघे रस्त्यावर फटाके फोडत होते. त्यावेळी दिपक याने ‘आमच्या घरी लहान बाळ आहे, त्याला फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो, तुम्ही अन्यत्र फटाके फोडा’ असे सांगण्यासाठी गेला होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात विश्वजित व इंद्रजित यांनी दिपकवर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात दिपक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मिरज येथे दवाखान्यात दाखल कारण्यात आले. पण उपचारा दरम्यान दिपकचा मृत्यू झाला. घटनेचा तासगाव पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इंद्रजित मोहिते व विश्वजीत मोहिते या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन.काबुगडे करीत आहेत.
दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांचा प्रवाशांना मनस्ताप
एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेली, तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील रहिवासी आहेत. ते गुरुवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातील फलाट क्रमांक नऊ परिसरात थांबले होते. एसटी बसमध्ये प्रवेश करताना ज्येष्ठाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. सोनसाखळी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.