Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh Railway Accident : य़ुपीत दोन मालगाड्यांची टक्कर; दोन लोको पायलट गंभीर जखमी

अपघातात जखमी झालेले अधिकारी अनुज राज (२८) आणि शंकर यादव (३५) यांची ओळख पटली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 04, 2025 | 04:56 PM
Uttar Pradesh Railway Accident : य़ुपीत दोन मालगाड्यांची टक्कर; दोन लोको पायलट गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे दोन मालगाड्यांमध्ये जोरदार धडक झाली. एक मालगाडी ट्रॅकवर थांबलेली असताना, मागून आलेल्या दुसऱ्या मालगाडीने तीला जोरदार धडक दिली. या अपघातात पुढील मालगाडीचा इंजिन आणि गार्डचा डबा ट्रॅकवरून खाली कोसळला.या अपघातात दोन्ही गाड्यांचे लोको पायलट गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) वर घडला. या मार्गावर फक्त मालगाड्याच धावतात, त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

दोन्ही लोको पायलटांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असून ट्रॅक साफ करण्याचे काम सुरू आहे. हा अपघात कानपूर-फतेहपूर दरम्यान खागा येथे पांभीपूरजवळील अप लाईनवर झाला.

Phalodi Satta Bazar: पुन्हा CM होण्याचे केजरीवालांचे स्वप्न भंगणार? आप अन् भाजपला किती जागा मिळणार? पहा अंदाज

सिग्नल रेड असताना अपघात
DFC अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ट्रॅकवर रेड सिग्नल होता, त्यामुळे एक मालगाडी थांबलेली होती. मात्र, मागून भरधाव आलेल्या दुसऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. दोन्ही गाड्यांमध्ये कोळसा भरलेला होता. या अपघातामुळे फ्रेट कॉरिडॉरच्या एका मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून अनेक मालगाड्या थांबवण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सिग्नल नसल्यामुळे एक मालगाडी रुळावर उभी होती, तेव्हा मागून दुसऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. ट्रेनमध्ये कोळसा भरलेला होता. अपघातानंतर, ट्रॅकवर कोळसा विखुरला होता. ही टक्कर इतकी जोरदार होती की ट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले.

Dhananjay Munde on Anjali Damania: दमानियांना विचारून सरकारने दर ठरवायचे का?

पायलटच्या चुकीमुळे अपघात?

DFC चे AGM जोगिंदर सिंग घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, या अपघाताची चौकशी सुरू असून प्राथमिक तपासात मानवी चूक (ह्यूमन एरर) असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजेच, पायलटच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे. कोणतीही मोठी हलगर्जीपणा झालेली नाही. सध्या बचावकार्य सुरू असून ट्रॅक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ट्रॅक दुरुस्त होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. अप लाईनवर अनेक मालगाड्या थांबलेल्या असून काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

पायलटने रेड सिग्नल पाहिले नाही?

DFCच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मागून येणाऱ्या मालगाडीने रेड सिग्नल पाहून थांबणे आवश्यक होते. मात्र, पायलटने रेड सिग्नल पाहिले नाही किंवा त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच समोर थांबलेल्या ट्रेनला जोरदार धडक बसली.

Web Title: Two goods trains collide in up two loco pilots seriously injured nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 03:51 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.