दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Phalodi Satta Bazar On Delhi Assembly Elections: दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान 5 तारखेला म्हणजेच उद्या मतदान होणार असून, 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वेगळा आणि कॉंग्रेस स्वबळावर निवडणूका लढवणार आहेत. प्रचार सभांचा जोर वाढला असून टीका टिप्पणी केली जात आहे. प्रचार सभांमध्ये भाजप विरोधी आम आदमी पक्ष अशी चुरशीची लढत दिसून येत आहे. दरम्यान या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान या जागेबाबत फलोदी सट्टा बाजारचा अंदाज काय आहे? हे जाणून घेऊयात.
काल दिल्ली विधानसभेचा प्रचार संपला आहे. त्यानंतर नवी दिल्ली येथे कोण जिंकणार याबद्दल फलोदी सट्टा बाजारात एक अंदाज मांडण्यात आला आहे. नवी दिल्ली मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून प्रवेश वर्मा आणि कॉँग्रेसकडून संदीप दीक्षित हे निवडणूक लढवत आहेत. संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे पुत्र आहेत.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता? नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची झोप
मतदानाआधीचा अंदाज काय?
यंदाची दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षासाठी कठीणच जाऊ शकते असे म्हटले जात आहे. यंदाची निवडणूक भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढवत आहे. ज्यामुळे आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. फलोदी सट्टा बाजारच्या नव्या अंदाजानुसार, दिल्ली विधानसभेत भाजपला 34 ते 36 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पार्टीला देखील 34 ते 36 जागांवर विजय मिळू शकतो. म्हणजेच यंदा दोघांमध्ये जोरदार लढत होताना पाहायला मिळू शकते.
या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा ही नवी दिल्लीच्या जागेची होत आहे. या जागेवर आपला विजय होणार असा विश्वास संदीप दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान फलोदी सट्टाबाजारच्या नवीन अंदाजानुसार, या ठिकाणी केजरीवाल यांना धक्का बसू शकतो. तसेच भाजपचे प्रवेश वर्मा हे विजयी होऊ शकतात.
हेही वाचा: Phalodi Satta Bazar: कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप
कोण करणार दिल्लीवर राज्य? फलोदी सट्टा बाजाराने उडवली ‘या’ पक्षांची झोप
काय होता फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज?
लोकसभा निवडणुकीत फलोदी सट्टा बाजाराने काही अंदाज वर्तवला होता. आता फलोदी सट्टा बाजाराने दिल्ली विधानसभेसाठी देखील काही अंदाज वर्तवले आहेत. राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराची भविष्यवाणी खरी ठरल्यास यंदा दिल्लीमध्ये चित्र संपूर्णपणे बदलले दिसू शकते. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार काहीसे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी कॉँग्रेसची मदत घ्यावी लागेल. तर भाजप हा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र जराही काही इकडे तिकडे झाल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. अर्थात फलोदी सट्टा बाजाराने हे अंदाज वर्तवले आहेत. नक्की काय निकल येणार हे निवडणुकीतच कळणार आहे.
महत्वाची बाब: ‘नवराष्ट्र डॉट कॉम’ कोणत्याही अंदाज, भविष्यवाणी, सट्टा बाजार याचे समर्थन करत नाही. त्यांनी जे सांगितलेले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.