धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येणार? अंजली दमानिया यांनी सरकारला दिला 'हा' इशारा (Photo Credit- Team Navarashtra)
मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप फक्त प्रसिद्धी आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले आहेत. सरकारने त्यांना विचारून दर ठरवायचे का, त्यांचे आतापर्यंतचे कोणतेही आरोप टिकले आहेत का, आम्ही शांत आहोत म्हणजे आम्हाला बोलता येत नाही, असं नाही, असे म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या धनंजय मुंडे यांचे आरोप धुडकावून लावले आहेत. तसेच त्यांन
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुरव्यानिशी आज राज्याच्या कृषी खात्यातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. महायुती सरकारमध्ये तत्त्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांची मालिकाच सुरू होती, असा आरोप करत दमानिया यांनी थेट कागदपत्रेच माध्यमांसमोर सादर केली. एकामागून एक घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत त्यांनी कृषी खात्यातील घोटाळे समोर आणले. तसेच आता तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही, असा सवालही उपस्थित केला. दमानिया यांच्यानंतर आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनीदेखील पत्रकार परिषद घेत त्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले की, नॅनो युरियामुळे पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने, नॅनोचा वापर जास्तीत जास्त केल्यास खताची जी जास्तीची सबसिडी द्यावी लागते, आणि डॉलरपेक्षा जास्त द्यावी लागते, ती किंमत कमी होते. नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपीचे दर संपूर्ण देशात समान आहेत. त्यामुळे या व्यवहारात कोणतीही तफावत नाही आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोप जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहेत.
“खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण केली जात आहे. अंजलीताईंनी यापूर्वी केलेल्या आरोपांवर विश्वास ठेवला जायचा, पण आता तो राहिलेला नाही.सरकारने इतर राज्यांपेक्षा अधिक टिकाऊ आणि सहा महिन्यांऐवजी वर्षभराची गॅरंटी असणारा पंप २८५७ रुपयांमध्ये खरेदी केला आहे. तसेच, या पंप खरेदीबद्दल लाभार्थी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कापूस साठवणूक बॅग खरेदी प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नाही, असं सांगत अंजली दमानिया यांनी कापूस बॅग खरेदीबाबत केलेल्या आरोपांनाही धनंजय मुंडेंनी उत्तर दिले. धनंजय मुंडे म्हणाले, “त्यावेळी राज्यात कापसाला भाव नव्हता आणि तो शेतकऱ्यांच्या घरी साठवला जात होता. वारंवार फवारणीमुळे लोकांच्या त्वचेवर परिणाम होत असल्याने कापूस साठवणूक बॅग खरेदी करण्याचा निर्णय घेतला.”
लग्नाआधीच मुलगी राहते सासरी, महाराष्ट्रातील ‘या’ समाजात विवाहसंस्कृतीतील अनोखी प्रथा नेमकी
याशिवाय, ‘सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारशी संबंधित कंपनी आहे आणि तिनेच या बॅगच्या किमती ठरवल्या होत्या. शासनाने त्या ठरवलेल्या किंमतीपेक्षा कमी दरातच बॅगा खरेदी केल्या आहेत, असेही धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले
मुंडेंनी दमानियांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, “सरकारने खरेदी करताना दमानियांना विचारून दर ठरवायचा का? जो दर त्यांना योग्य वाटेल तोच बरोबर, आणि जो नसेल तो भ्रष्टाचार, असे आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आजवर माझ्यावर अनेक आरोप झाले, पण ५८ दिवस झाले तरी एकही आरोप टिकला आहे का? दमानियांनी बहुजन समाज आणि बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.” त्यांनी मीडिया आणि जनतेला खुले आव्हान देत सांगितले की, दमानियांनी लावलेला एक तरी आरोप राज्यात किंवा देशात टिकला आहे का? तो सिद्ध झालाय का?” असा सवालही धनंजय मुंडेंनी विचारला.