Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Crime News: विषारी ताडी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बारामती पोलिसांकडून दोघे अटकेत

चौकशीत आरोपीने ही रासायनिक पावडर ताडीमध्ये मिसळून ताडी तयार करत असल्याची कबुली दिली. तसेच सदरची ताडी व रासायनिक पावडर बाबु भंडारी (रा.सणसर ता.इंदापूर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 27, 2026 | 03:51 PM
Baramati Crime News, Tadi Vikri, Baramati Police, बारामतीत ताडी विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Baramati Crime News, Tadi Vikri, Baramati Police, बारामतीत ताडी विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Follow Us
Close
Follow Us:
  • मानवी जिवाला घातक ठरणारी विषारी ताडी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • ताडीमध्ये मिसळली जाणारी ‘क्लोरोहायड्रेट’ ही अत्यंत धोकादायक
  • आरोपीकडून रासायनिक पावडर ताडीमध्ये मिसळून ताडी तयार करत असल्याची कबुली
Baramati Crime News: बारामती तालुका पोलिसांनी झारगडवाडी येथे मानवी जिवाला घातक ठरणारी विषारी ताडी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० लिटर विषारी ताडी आणि ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रासायनिक पावडर जप्त केली असून, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

२५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना, पोलिसांना झारगडवाडीत बेकायदेशीर ताडी विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, चिन्नया दत्तु गुत्तेदार (वय ३२) हा घराच्या आडोशाला ताडी विकताना रंगेहात सापडला. त्याच्याकडून ३० लिटर ताडी जप्त करण्यात आली. तसेच घराची झडती घेतली असता, ताडीमध्ये मिसळली जाणारी ‘क्लोरोहायड्रेट’ ही अत्यंत धोकादायक रासायनिक पावडरही मिळून आली.

राज्यातील रस्त्यांवर वाढतीये वाहनांची संख्या; फक्त एका वर्षात झाली तब्बल ‘इतक्या’ लाख वाहनांची नोंद

चौकशीत आरोपीने ही रासायनिक पावडर ताडीमध्ये मिसळून ताडी तयार करत असल्याची कबुली दिली. तसेच सदरची ताडी व रासायनिक पावडर बाबु भंडारी (रा.सणसर ता.इंदापूर) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. त्यास सुद्धा ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, विषारी ताडीचा नमुना रासायनिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. उर्वरित विषारी ताडी घटनास्थळीच नष्ट करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चिन्नया गुत्तेदार व बाबु भंडारी यांच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम १२३ (दहा वर्षे शिक्षा) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ख)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.

Latur ZP Election 2026: काँग्रेस उमेदवाराचे ‘अपहरण’ की राजकीय खेळी? २० गाड्यांच्या ताफ्यासह माघार, काँग्रेसला धक्का

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम पोलीस अमलदार मनोज पवार सौरभ तुपे सुरेंद्र वाघ भारत खारतोडे जितेंद्र शिंदे दादा दराडे आफ्रिन शेख यांनी केली आहे.

 

Web Title: Two individuals selling poisonous toddy using chemical powder have been arrested by baramati police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Baramati Crime News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.