Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; API महेश विघ्नेसह दोघांची उचलबांगडी

या प्रकरणावर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी महेश विघ्ने यांच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2025 | 01:09 PM
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट;  API महेश विघ्नेसह दोघांची उचलबांगडी
Follow Us
Close
Follow Us:

बीड:  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्याप्रकरणामुळे राज्यभरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर जवळपास 22 दिवसांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने पोलिसांना सरेंडर केले. त्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसात या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांनाही अटक करण्यात आली. संपूर्ण बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात या हत्येचा निषेध करण्यात आला. पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारवरचा दबाव वाढला. त्यानंतर महायुती सरकारने संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांची विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केली. पण, या एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासार्हतेवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत, एसआयटी पथकाचे प्रमुख, IPS डॉ. बसवराज तेली यांचा अपवाद वगळता, इतर सर्व पोलिस अधिकारी वाल्मिक कराडचीच माणसे असल्याचा दावा त्यांनी केला.

एपीआय महेश विघ्नेसह दोघांची उचलबांगडी

जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडची चौकशी करणाऱ्या एसआयटी कमिटीत असलेले एपीआय महेश विघ्ने यांचा फोटो ट्विट केला. यात महेश विघ्ने आणि वाल्मिक कराड यांचा सोबत असलेला हा फोटो होता. जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यानंतर एपीआय महेश विघ्ने यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. याचप्रमाणे इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही या एसआयटीमधून बाजूला करण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सूत्रधार म्हणून आरोप केलेल्या वाल्मिक कराड सोबत महेश विघ्ने यांचा फोटो वायरल झाला. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी महेश विघ्ने यांच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परिणामी या सर्व घडामोडींची दखल घेत एपीआय महेश विघ्ने यांच्यासह हवलदार मनोज वाघ यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महेश विघ्ने यांची पुण्यात बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

जितेंद्र आव्हाड, सुरज चव्हाण यांनी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते ते सर्व बीड स्थानिक गुन्हे शाखेच कर्मचारी आहेत. एसआयटीमध्ये या अधिकाऱ्यांचा समावेश झाल्यानंतरही बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना रिलीव्ह केले नाही. म्हणजेच तिघेजण आता एसआयटीचा भाग असणार नाहीत. पण याच मुद्द्यावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनीही आरोपीच्या कोणी जवळचा SIT मध्ये असेल तर त्याला तत्काळ दूर करण्याची मागणी केली होती. तसेच, या प्रकरणात कोणी राजकारण करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं होते.

 

Web Title: Two people including api mahesh vighne transferred in santosh deshmukh case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Beed crime News
  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला
1

Beed Crime: आज माझा वाढदिवस, तुझा मूळशी पॅटर्न करतो! अंबाजोगाईत तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं हल्ला

Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
2

Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Beed Crime: बीड हादरलं! सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध; दोघांनी मिळून…
3

Beed Crime: बीड हादरलं! सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध; दोघांनी मिळून…

Beed Crime : पत्नीची निर्घृण हत्या,  पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…, परळीतील डाबी गावातील थरकाप उडवणारी घटना
4

Beed Crime : पत्नीची निर्घृण हत्या, पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…, परळीतील डाबी गावातील थरकाप उडवणारी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.