खोक्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट देणं दोन पोलिसांना भोवलं
बीड : सतीश भोसले ऊर्फ खोक्या भाई याची राज्यभरात सध्या चर्चा सुरु आहे. सतिश भोसले याला प्रयागराज येथून अटक करण्यात आला. त्यानंतर त्याला बीड येथे आणण्यात आले. त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. पण, आता त्याला तुरुंगात शाही पाहुणचार मिळत असल्याचे समोर आले आहे. शाही बडदास्त ठेवत असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
खोक्या भाईने एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केली. तसेच इतर दोन प्रकरणात बीडचा खोक्या भाई राज्यभरात अचानक चर्चेत आला आहे. त्याचे कारनामे समोर आले आहेत. प्रयागराज येथून त्याच्या मुसक्या आवळत त्याला बीडला आणण्यात आले. त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला. पण आता बीड पोलीस त्याची शाही बडदास्त ठेवत असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सतीश भोसले ऊर्फ खोक्याला देण्यात येत असलेली व्हीआयपी ट्रीटमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
बीड पोलिसांकडून खोक्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला बीड पोलिसांनी जेलबाहेर आणल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत खोक्या बिनधास्त मोबाईलवर बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोमवारी दुपारीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
बीड पोलिसांकडून शाही ट्रीटमेंट
बीड पोलिसांकडून खोक्यासारख्या गुंडाला शाही वागणूक दिली जात असल्याने पोलीस दलाच्या कर्तव्याबाबत पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. खोक्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बीड पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये इतर काही अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.