Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cylinder Blast: पुलाची शिरोलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन महिला गंभीर जखमी

गॅस सुरू करण्यासाठी त्यांनी देवाजवळ लावलेला दिवा खाली घेताच अचानक मोठा स्फोट झाला. यामध्ये सविता व कुसुम गंभीर जखमी झाल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 20, 2025 | 02:35 AM
Cylinder Blast: पुलाची शिरोलीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन महिला गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:
शिरोली: पुलाची शिरोली येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन महिला गंभीर जखमी झाल्या. सविता प्रभाकर बेकने व कुसुम भिमराव कोरे ( ४५, दोघीही रा. व्यंकटेश्वर नगर,  पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) अशी जखमी महिलांची नावे आहेत. सविता बेकने यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुलाची शिरोली येथील वेंकटेश्वर नगर येथे घडली. दोन्ही महिलांवर कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यापैकी रात्री उशिरा सविता बेकने यांना सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ,सविता व कुसुम या दोन्ही महिला जेवणाच्या ऑर्डरी घेऊन आचारीचे काम करतात. उन्हाळा असल्यामुळे उन्हाळ्याचे सांडगे पापड करण्यासाठी सकाळी सविता यांनी गॅस सुरू करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सिलेंडरमध्ये रेग्युलेटर जवळ असणारे वायसर खराब असल्याने कमी प्रमाणात पण सातत्याने गॅसची गळती सुरू होती हे त्यांच्या लक्षात आले नाही.

गॅस सुरू करण्यासाठी त्यांनी देवाजवळ लावलेला दिवा खाली घेताच अचानक मोठा स्फोट झाला. यामध्ये सविता व कुसुम गंभीर जखमी झाल्या. सविता यांना सुमारे सत्तर टक्के भाजले आहे. तर कुसुम यांनाही मोठ्या प्रमाणात भाजले आहे. दोघींनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र सविता यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने रात्री उशिरा त्यांना सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झालेली नव्हती.

पुण्यातील वारजेत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

पुणे शहरातील वारजे भागात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटात दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, यामध्ये मोठी आगही लागली होती. स्फोटानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले.

पुण्यातील वारजेत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; संपूर्ण घर जळून खाक, दोघांचा मृत्यू
वारजे येथे पत्र्याच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सिलेंडरचे सर्व भाग वेगळे झाले. सिलेंडर पाच-सहा भागात फुटला असून, या स्फोटात घरातील सर्व भांडी, इतर सामान, संपूर्ण घर उद्धवस्त झालं आहे. इतकेच नाहीतर सिलेंडरची वरची रिंगदेखील सिलेंडरपासून वेगळी होत उडाली. यानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. सिलेंडरच्या स्फोटात गॅसदेखील पूर्णपणे फुटला असून, त्याचे विविध भागात तुकडे झाले आहेत. पत्र्यांचं बांधकाम असलेल्या घराचे पत्रे पूर्णपणे उडाले आहेत.

Web Title: Two womens injured cylinder blast in pulachi shiroli kolhapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Cylinder Blast
  • Kurundwad
  • sangli news

संबंधित बातम्या

Bangalore Cylinder Blast: बंगळुरूत सिलेंडर ब्लास्ट झाला अन् छत…; ८ वर्षांच्या मुलाचा करूण अंत
1

Bangalore Cylinder Blast: बंगळुरूत सिलेंडर ब्लास्ट झाला अन् छत…; ८ वर्षांच्या मुलाचा करूण अंत

Sangli News : थकित पगार वेळेवर द्या, ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक; भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा
2

Sangli News : थकित पगार वेळेवर द्या, ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक; भाजप सरकारच्या विरोधात मोर्चा

Raju Shetti : 15 ऑगस्ट ला ग्रामसभांच्या माध्यमातून तीव्र विरोध करणार
3

Raju Shetti : 15 ऑगस्ट ला ग्रामसभांच्या माध्यमातून तीव्र विरोध करणार

मोठी बातमी ! मुंबईच्या वांद्रेत सिलेंडरचा भीषण स्फोट; स्फोटानंतर तीन मजली चाळच कोसळली
4

मोठी बातमी ! मुंबईच्या वांद्रेत सिलेंडरचा भीषण स्फोट; स्फोटानंतर तीन मजली चाळच कोसळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.