Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पुण्यनगरीत गोळीबाराचा थरार! शेतकऱ्याच्या घरावर 9 गोळ्या झाडल्या; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

अचानक गोळीबार झाल्याने दहशतीचे देखील वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाणअयाचे वरिष्ठ निरीक्षक पंडीत रेजीतवाड तसेच गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने धाव घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2024 | 07:25 PM
Crime News: पुण्यनगरीत गोळीबाराचा थरार! 9 गोळ्या थेट शेतकऱ्याच्या ....; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Crime News: पुण्यनगरीत गोळीबाराचा थरार! 9 गोळ्या थेट शेतकऱ्याच्या ....; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: कोयत्यांची जागा हळूहळू पिस्तूलांनी घेण्यास सुरूवात केली असून, त्यातून बार उडवत दहशत देखील माजवली जात आहे. वाघोलीत पहाटेच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या घरावर पहाटे गोळीबार केला आहे. तब्बल ९ गोळ्या झाडण्यात आल्याचे  सांगण्यात आले आहे. या प्रकरणी लोणीकंद (वाघोली) पोलीस ठाण्यात निलेश सुभाष सातव (वय ३३) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्ल्या माहितीनुसार, निलेश सातव हे वाघोलीतील वडजाई वस्तीत राहण्यास आहेत. ते शेतकरी असून, त्यांची मोठी शेती आहे. त्यांचा जमीन खरेदी व विक्रीचे देखील व्यवहार आहेत. कुटूंबासह तेथे राहण्यास आहेत. दरम्यान, मध्यरात्री सव्वा चारच्या सुमारास सातव कुटूंबासह घरात झोपलेले असताना त्यांच्या घराजवळ येऊन एकाने खिडकीतून त्यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने ते या गोळीबारातून बचावले गेले. गोळी त्यांना लागली नाही.

मात्र, पहाटेच्यावेळी गोळीबार झाल्याने वस्तीवर चांगलाच गोंधळ उडाला होता. अचानक गोळीबार झाल्याने दहशतीचे देखील वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस ठाणअयाचे वरिष्ठ निरीक्षक पंडीत रेजीतवाड तसेच गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने धाव घेतली. दरम्यान, सातव यांचे कोणाशी वाद किंवा जुने वाद तसेच इतर काही नाही. त्यानंतरही गोळीबार झाल्याने नेमका हा गोळीबार कसा झाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण

नगर रस्त्यावरील डंपरने कामगारांना चिरडल्याप्रकरणात पोलिसांनी डंपर मालकाला अटक केली आहे. त्याने निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवून त्याला अटक केली आहे.  अनिल काटे (३९) असे अटक करण्यात आलेलया डंपर मालकाचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांत गुन्हा नोंद आहे. नगर रस्त्यावरील वाघोली चौकात भरधाव डंपर चालकाने मध्याच्या नशेत फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडले होते. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झालेले आहेत. यात एक तरुणी गंभीर असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा: वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण; पोलिसांकडून मालकावर अटकेची कारवाई

पोलिसांनी अनिल काटे याला वाघोली पोलीस ठाण्यात चौकशीस बोलविले होते. तपासात अनिल काटे याला डंपर चालकाला दारू पिण्याच व्यसन होते हे माहिती होते. जेव्हा डंपर चालक डंपर घेऊन चालला होता तेव्हा काटे याला याबाबत माहिती होती. तसेच चालकाने डंपर मधील माल आव्हाळवाडी येथे उतरवला होता. तपासात काटे याने चालकाने डंपर घेऊन जाताना दारू पिली होती का नव्हती याबद्दल माहिती नसल्याचेही सांगितले. यामध्ये पोलिसांनी सांगितले की, एकतर मालकाने मद्यपी डंपर चालकाला गाडी चालविण्यासाठी द्यायला नको होती. तसेच त्याला नोकरीवर ठेवताना गाडी चालविताना मद्य प्राषन करून गाडी चालवयची नाही असेही नोकरीवर ठेवण्यापूर्वी वारंवार सांगणे अपेक्षीत होते. त्यामुळे या प्रकरणी डंपर मालकाला अटक करण्यात आली.

 

The liveblog has ended.
No liveblog updates yet.

Web Title: Unknown person fired 9 bullets to farmers house at wagholi pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 05:39 PM

Topics:  

  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
1

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर
2

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर
3

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.