Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटच्या लेकरांना जंगलात नेऊन संपवले; आईला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्थिक नैराश्य आणि वैवाहिक वादाला कंटाळून स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या करणाऱ्या आईला पुणे सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2026 | 12:42 PM
पोटच्या लेकरांना जंगलात नेऊन संपवले; आईला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

पोटच्या लेकरांना जंगलात नेऊन संपवले; आईला न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:
  • पूनम सोलंकी हिने स्वतःच्या दोन चिमुकल्यांची हत्या केली
  • ५ जानेवारी २०२२ रोजी मुळशीतील शिरवली येथे घटना घडली
  • पुणे न्यायालयाने आरोपी आईला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्थिक नैराश्य आणि वैवाहिक वादाला कंटाळून स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांची हत्या करणाऱ्या आईला पुणे सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय दहा हजार रुपये दंड आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. भंसाळी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. पूना उर्फ पूनम संजय सोलंकी (वय २८, मूळ रा. खांडवा, मध्य प्रदेश) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

पूनम सोलंकी हिने स्वतःच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा आणि दोन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला होता. ही धक्कादायक घटना ५ जानेवारी २०२२ रोजी मुळशी तालुक्यातील शिरवली शिवारात घडली होती. याप्रकरणी तिचे पती संजय सोलंकी यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सोलंकी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले होते. ते शिरवली परिसरात बांधकाम कामगारांसाठी असलेल्या छोट्या घरात राहत होते. पूनम मुलांना वारंवार मारहाण करत असल्याचे तपासात समोर आले होते. मुलांना मारू नको, असे समजावून सांगितल्यास ती चिडचिड करत असे.

लोणावळ्यात भावाकडे जाताना मुलांचा खून

५ जानेवारी रोजी पूनम दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडली. बराच वेळ मुले आणि पत्नी घरी न परतल्याने पती संजय यांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, पूनमने दोन्ही मुलांना जंगलात नेले आणि दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर ती मुलांना तिथेच सोडून लोणावळ्यात राहणाऱ्या भावाकडे गेली. दुसऱ्या दिवशी पूनमच्या भावाने संजय यांना फोन करून ती मुलांशिवाय लोणावळ्यात आल्याची माहिती दिली. मुलांबाबत विचारणा केली असता, पूनमने दोन्ही मुलांना मारून गवतात टाकल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विजय फरगडे आणि अनिलकुमार वर्मा यांनी कामकाज पाहिले. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे पूनमला मुलांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. अखेर तिला दुहेरी जन्मठेप, दहा हजार रुपये दंड आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली.

हे सुद्धा वाचा : वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: दोन चिमुकल्यांच्या हत्या प्रकरणात आईला कोणती शिक्षा सुनावण्यात आली?

    Ans: पुणे सत्र न्यायालयाने पूनम सोलंकी हिला दुहेरी जन्मठेप, दहा हजार रुपये दंड आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली होती?

    Ans: ही घटना ५ जानेवारी २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शिरवली शिवारात घडली होती.

  • Que: आरोपी महिलेने आपल्या मुलांची हत्या कशी केली?

    Ans: पूनम सोलंकी हिने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा आणि दोन वर्षांच्या मुलाचा जंगलात दोरीने गळा आवळून खून केला होता.

Web Title: The court has handed down a severe sentence to a mother who murdered her two young children nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ
1

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ

Wardha Murder Case: “काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला…” इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!
2

Wardha Murder Case: “काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला…” इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!

वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं
3

वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला
4

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.