डंपरने लोकांना चिरडल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई (फोटो- istockphoto )
पोलिसांनी अनिल काटे याला वाघोली पोलीस ठाण्यात चौकशीस बोलविले होते. तपासात अनिल काटे याला डंपर चालकाला दारू पिण्याच व्यसन होते हे माहिती होते. जेव्हा डंपर चालक डंपर घेऊन चालला होता तेव्हा काटे याला याबाबत माहिती होती. तसेच चालकाने डंपर मधील माल आव्हाळवाडी येथे उतरवला होता. तपासात काटे याने चालकाने डंपर घेऊन जाताना दारू पिली होती का नव्हती याबद्दल माहिती नसल्याचेही सांगितले.
यामध्ये पोलिसांनी सांगितले की, एकतर मालकाने मद्यपी डंपर चालकाला गाडी चालविण्यासाठी द्यायला नको होती. तसेच त्याला नोकरीवर ठेवताना गाडी चालविताना मद्य प्राषन करून गाडी चालवयची नाही असेही नोकरीवर ठेवण्यापूर्वी वारंवार सांगणे अपेक्षीत होते. त्यामुळे या प्रकरणी डंपर मालकाला अटक करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नेमके प्रकरण काय?
पुण्यात रात्री फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले. त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असून जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघोलीच्या केसनंद नाका येथील पोलीस ठाण्यासमोर ही घटना घडली.
पुण्यातील वाघोली येथील केसनांद फाट्यावर रात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. डंपर चालक दारूच्या नशेत होता, अशी प्राथमिक माहिती आहे. ठार झालेल्यांमध्ये वैभव रितेश पवार (वय 2 वर्षे) आणि रिनेश नितेश पवार (वय 3 वर्षे) या दोन निष्पाप मुलांचा समावेश आहे, तर इतर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा: Pune Road Accident: धक्कादायक! पु्ण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले
अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी (२२ डिसेंबर) रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण 12 जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपर थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले. आरडाओरडा ऐकू आल्यावर आजूबाजूचे लोक पीडितांना वाचवण्यासाठी धावले. यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. अपघातानंतर डंपरचालक फरार झाला पण काही तासांतच पोलिसांच्या एका पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी डंपर चालकाचे नाव गजानन शंकर तोट्रे, (26 वर्षे) असे असून तो मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. तसेच त्याला बैद्यकीय तपासणीसाठीही पाठवण्यात आले आहे.