महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार, भाजप आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
Bjp Mla Harish Shakya News In Marathi : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिलसी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार हरीश शाक्य आणि त्यांचा भाऊ सतेंद्र शाक्य यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गँगरेप आणि फसवणुकीच्या कलमांखाली सर्वांवर कारवाई केली जाईल. खासदार-आमदार अतिरिक्त मुख्य न्यायाधीश लीलू चौधरी यांनी या प्रकरणी आदेश दिले आहेत. पीडितेच्या पतीने न्यायालयात धाव घेतली होती. या आदेशानंतर भाजप आमदार हरीश शाक्य यांच्या अडचणी वाढू शकतात.
बदाऊनचे बिलसीचे भाजप आमदार हरीश शाक्य यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल करून दहा दिवसांत न्यायालयाला माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी ऐकले नाही तेव्हा पीडितेने कोर्टाचा आसरा घेत दाद मागितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. खासदार-आमदार न्यायालयाने भाजपच्या बिलसी आमदारासह 16 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. भाजप आमदारावर आपल्या भावांसह गरिबांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. तसेच एका महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार देखील केले. पोलिसांनी अहवाल न दिल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतली. दहा दिवसांत अहवाल सादर करून न्यायालयाला कळवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ही घटना उत्तर प्रदेशातल्या बदायू जिल्ह्यातील असून येथील सिव्हील लाईन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची बिल्सीचे भाजप आमदार हरीश शाक्य, त्यांचे भाऊ आणि इतर काहीजणांसोबत जमीनीचा वाद सुरू होता. यानंतर पीडित तरुणानं कोर्टात याचिका दाखल करत, भाजप आमदार दमदाटी करून आपली कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी १७ सप्टेंबर २०२४ रोजी पीडित तरुण आपली आई आणि पत्नीसह भाजप आमदाराच्या कार्यालयात गेले होते. यावेळी भाजप आमदार हरीश शाक्य आणि इतर दोन जणांनी पीडित व्यक्तीच्या पत्नीसोबत सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित व्यक्तीनं आमदार हरीश शाक्य यांच्यासह १६ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पीडित व्यक्तीनं न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आता न्यायालयाने पोलीस प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
बिलसी जिल्ह्याचे आमदार हरीश शाक्य, त्यांचे बंधू सतेंद्र आणि धरमपाल शाक्य, पुतणे ब्रजेश कुमार शाक्य रा. कादराबाद, हरिशंकर व्यास रा. जालंधारी सराय पोलीस स्टेशन सदर कोतवाली, अनेग पाल रा. हाऊसिंग डेव्हलपमेंट बदायूं, आनंद प्रकाश अग्रवाल, अनुराग अग्रवाल, एन. सिव्हिल लाइन्स बरेली, मनोजकुमार गोयल नारायणगंज उजनी, शैलेंद्र कुमार सिंग पंजाबी कॉलनी नारायणगंज उजनी, हरिश्चंद्र वर्मा, रहिवासी डीएम रोड प्रेम नगर बदायूं, विपिन कुमार बहार चुंगी बदायूं, चंद्रावती, दिनेश कुमार, रामपाल, दिनेशचंद्र यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमदार हरीश शाक्य यांचे म्हणणे आहे की, माझ्याकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. कोणताही आदेश झाला असेल तर न्यायालयाचा उतारा आधी पाहिला जाईल, त्यानंतरच काही सांगता येईल.