
crime (फोटो सौजन्य: social media)
एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीचा खून; दारू पिण्यासाठी बोलावले अन्…
काय नेमकं प्रकरण?
पीडित मुलीची काही मुले छेड काढत होते. तिने घडलला हा सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितले. त्यांनतर कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठत या मुलांविरोधात
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी अजय पाल सिंह म्हणाले की, हे आरोपी अल्पवयीन असून अल्पसंख्यांक समुदायातून येतात, ते शाळेत जात नाहीत, दिवसभर परिसरात फिरत राहतात. आरोपी मुले आणि पीडित मुलगी एकमेकांना वैयक्तिक ओळखत नाहीत. हे आरोपी अल्पवयीन आहेत म्हणून पोलिसांनी त्यांच्या आई वडिलांना नोटीस पाठवली होती. मुलांचे व्यवस्थतीत संगोपन न करणे आणि चांगले संस्कार न दिल्याबद्दल पोलिसांनी आरोपींच्या आईला अटक केली आहे. मुलांवर संस्कार करण्यास ते अयशस्वी ठरले त्यामुळे पोलिसांनी आईला अटक केली.
पोलीस वडिलांनाही करणार अटक
छेड काढणाऱ्या चारही आरोपींच्या आईवर कारवाई झाली आता वडिलांवरही करणार असल्याचे समोर आले आहे. चारही आरोपींचे वडील हे सध्या उत्तरप्रदेश बाहेर काम करतात. ते घरी परतल्यानंतर त्यांनाही अटक केली जाणार. मुलांच्या कृत्याप्रकरणी जबाबदार म्हणून पोलिसांनी ही कारवाई केलीय.
कायदे विश्लेषकांनी व्यक्त केली चिंता
या प्रकरणी कायदे विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली. BNS म्हणजे भारतीय न्याय संहितेत काही तरतुदी बदलण्यात आल्या आहेत. त्यातून पोलीस सार्वजनिक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अथवा संभाव्य गुन्हा रोखण्यासाठी काही तरतुदीतून कारवाई करू शकतात. कुठलीही सूचना न देता अथवा जाणुनबुजून अल्पवयीन आरोपींच्य आई वडिलांविरोधात या तरतुदींचा वापर करणे दुर्लभ आहे आणि कोर्टात याला आव्हान दिले जाऊ शकते.दरम्यान, पॉक्सो अंतर्गत बाल लैंगिक शोषणातील आरोपींना वाचवण्यासाठी काही प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे. परंतु जोपर्यंत निष्काळजीपणा अथवा उकसवण्याचे पुरावे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत पालकांना दोषी ठरवता येत नाही असंही तज्ज्ञ सांगतात.
Ans: बदायूंमध्ये काही अल्पवयीन मुलांनी शाळकरी मुलीची छेडछाड केल्याची तक्रार दाखल झाली होती.
Ans: आरोपी मुले अल्पवयीन असल्याने, त्यांच्यावर योग्य संस्कार न केल्याबद्दल पोलिसांनी पालकांना जबाबदार धरले.
Ans: कायदे तज्ज्ञांच्या मते, पालकांचा निष्काळजीपणा सिद्ध न झाल्यास ही कारवाई कोर्टात आव्हानास पात्र ठरू शकते.