Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसई विरारमध्ये आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आठवडाभरातील तिसरी घटना

गेल्या काही आठवड्यांपासून बाललैंगिक अत्याचाराच्या बातम्या आणि लोकांचा रोष बघता भारतात बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढतंय, असं चित्र समोर येतंय. नुकतेच कोलकाता ट्रेनी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या, त्यानंतर बदलापूर दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार होत असताना वसई-विरारमधून आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे समोर आलं.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 28, 2024 | 04:55 PM
वसई विरारमध्ये आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आठवडाभरातील तिसरी घटना

वसई विरारमध्ये आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, आठवडाभरातील तिसरी घटना

Follow Us
Close
Follow Us:

रवींद्र माने, वसई : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणाचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळं, ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजवत आहेत, असं संतप्त नागरिकांचं म्हणणे आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशातच आज (28 ऑगस्ट) पुन्हा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणखी एक घटना विरारमध्ये घडली असून गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घटना उघड झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.

हे सुद्धा वाचा: पुन्हा अत्याचार ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला नराधमाने खोलीत नेलं अन्…

नालासोपारा पूर्वेकडील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच नायगाव येथील एका शाळेतील सात वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या १७ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. या दोन घटना ताज्या असतानाच आता विरारमध्ये या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची माहिती मिळत आहे.

विरार पूर्वेकडील मनवेल पाड्याच्या सह्याद्री नगरमध्ये प्रमोद मौर्या नावाचा शिक्षक खासगी ट्युशन क्लास चालवतो. या क्लासमध्ये शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा मोर्या ने मागील आठवड्यात लैंगिक अत्याचार केला होता. या भितीने ती अल्पवयीन मुलगी २ दिवस ट्युशनला गेली नाही. त्यामुळे ट्युशनला का जात नाही असा तिच्या कुटुंबीयांनी प्रश्न विचारल्यावर तिने झाला प्रकार सर्व कुटुंबियांना सांगितला. हा प्रकार समजल्यावर बुधवारी सकाळी मुलीचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक ट्युशनमध्ये गेले. त्यांनी मोर्याला मारहाण करून त्याची धिंड काढली.

हे सुद्धा वाचा:  धक्कादायक ! आतेभावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार; घरात कोणीही नसल्याची संधी साधली अन्…

यथेच्छ धुलाई केल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेय या शिक्षकाने ३ ते ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप यावेळी संतप्त नागरिकांनी केला. मुलांना शिक्षकांकडे शिकविण्यासाठी विश्वासने पाठवतो परंतु ते असा घृणास्पद प्रकार करत असल्यामुळे आम्ही करायचे काय? असा चिंतीत प्रश्न पालकांनी यावेळी उपस्थित केला.

नागरिकांनी आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीची छेड काढून लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. तिचा जबाब नोंदवत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे विजय पवार यांनी दिली.

Web Title: Vasai virar in minor student molested and third incident in a week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 04:55 PM

Topics:  

  • Badlapur school case
  • Kolkata doctor case

संबंधित बातम्या

Badlapur Encounter: न्यायालयाने फटकारताच CIDची ताबडतोब कारवाई; पोलिसांना सादर केले पेपर्स
1

Badlapur Encounter: न्यायालयाने फटकारताच CIDची ताबडतोब कारवाई; पोलिसांना सादर केले पेपर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.