समुपदेशनाच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण (फोटो सौजन्य: Freepik)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. बदलापूर, पुणे, लातूरनंतर आता अमरावती येथे एका अल्पवयीन मुलीला मारण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. ही घटना फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि. 20) उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
हेदेखील वाचा : CBI ची रेड पडल्यानंतर अधिकाऱ्याने संपवले जीवन; मेसेज लिहित सांगितले खरे कारण
प्रशिल उर्फ पवन रमेश अवसरमोल (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित 17 वर्षीय मुलीची प्रशिलसोबत मालटेकडीजवळील एका ज्यूसच्या गाडीवर ओळख झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसूत जुळले. या काळात प्रशिल हा तिला भेटण्यासाठी बोलवत होता. तिने नकार दिल्यावर तो तिला मारण्याची धमकी देत होता. सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ती घरगुती साहित्य आणण्यासाठी परिसरातील एका दुकानात गेली. त्यावेळी प्रशिल हा तेथे दुचाकीने आला. तिला मारून खोलीवर भेटायला बोलावले.
दरम्यान, पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यावर ‘तू नाही आली, तर मी तुला मारेन’, अशी धमकी त्याने तिला दिली. त्यामुळे भीतीपोटी ती त्याच्या खोलीवर गेली. त्यावेळी प्रशिलने तिच्यासोबत जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि निघून गेला. दरम्यान, काही वेळाने पीडित मुलीची आई व बहीण तिला शोधत तेथे आली. तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हेदेखील वाचा : विवाहबाह्य संबंध पडले महागात! प्रेयसीने गळा दाबून केली प्रियकराची हत्या, मृतदेहाची लावली विल्हेवाट