एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार (File Photo : Crime)
पाटण : गेल्या काही दिवसांपासून मुलींसह महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात सातारा जिल्ह्यात आतेभावानेच एका 15 वर्षीय बहिणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोयना परिसरातील एका गावात घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात कोयना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : बदलापूरमध्ये पुन्हा नात्याला काळिमा! वडिलांनीच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार
गेल्या अनेक वर्षांपासून कोयना विभागातील एका गावात वास्तव्यास असणाऱ्या पण सध्या दुसरीकडे राहण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आतेभावाने अत्याचार केला. संबधित मुलगी 4 जून 2024 रोजी घरात एकटी असताना आतेभावाने जबरदस्तीने अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित कुटुंब भीतीच्या छायेत होते.
दरम्यान, नंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी कोयनानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची हकीकत ऐकून घेतल्यावर बोंद्री येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. पाटणचे पोलीस उपअधीक्षक विजय पाटील यांनी तात्काळ संशयिताला अटक करण्यासाठी स्वतः सापळा रचला.
अत्याचाराच्या घटना थांबता थांबेना !
कोलाकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर प्रचंड आक्रोश पाहिला मिळाला. असे असताना महाराष्ट्रातील बदलापूर, पुणे, लातूर सारख्या शहरांमध्येही अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आताही हे एकप्रकारचे सत्रच सुरू असल्याचे सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे समोर येत आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता आतेभावानेच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे सुद्धा वाचा: ‘ती ओरडत होती म्हणून तिचा गळा दाबला’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? आरोपी संजय रॉयची संतापजनक कबुली