crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
वाशीम जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीला दवाखान्यात नेण्याच्या मामुली वादातून पतीने पत्नीवर धारदार शास्त्राने वार करून तिची हत्या केली. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना वाशीम जिल्ह्यंक्तही कोठारी गावात घडली आहे. या घटनेने वाशीम जिल्ह्या हादरून गेला आहे.
पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार; रात्री दारू पिऊन घरी आला अन्…
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हिम्मत धोंगडे (वय अंदाजे 40),कल्पना धोंगडे (वय अंदाजे 35) असे मृतकाचे नाव आहे. हिम्मत हा व्यक्ती व्यसनाधीन असून त्याला मानसिक आजाराचा त्रासही होता. कल्पना ही तिच्या पाटील उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा आग्रह धरत होती. मात्र या किरकोळ वादातून संतापलेल्या हिम्मत याने घरातील धारदार विळ्या -कुऱ्हाडीने पत्नीवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या कल्पना ही घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर हिम्मत याने स्वतः देखील घर बंद करून आत गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे काही क्षणातच एकाच घरातील दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या दुहेरी घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका क्षणात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्याने कोठारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात हा प्रकार व्यसनाधीनता आणि मानसिक अस्वस्थतेतून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करत आहेत.
बीड कारागृहात कैद्यांकडून अधीक्षकाची खाजगी गाडी धुण्याचे काम
बीड जिल्हा कारागृहातील एक व्हिडीओ सध्या वायरल होत आहे. बीड जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांचे खाजगी वाहन एका कैद्याकडून धुतले जात असल्याचं समोर आला आहे. सचिन कृष्णार्थ कदम हा कैदी एका गंभीर गुन्ह्यात दहा वर्षांची जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कैद्यांकडून कारागृह अधीक्षकांची खाजगी गाडी धुतली जात आहे. शिवाय हा कैदी कारागृहाच्या परिसरात मुक्त संचार देखील करत असल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
या आधीपण सापडले वादात
आरटीओ विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार MH 27 BV 9517 ही गाडी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या मालकीची आहे. 2021 मध्येच या कारचा इन्शुरन्स संपलेला असताना देखील ही गाडी रस्त्यावर फिरते आहे. हीच खाजगी गाडी या कैद्याकडून धुवून घेतली जातेय. बूट पॉलिश, भांडे घासणे आणि कपडे धुऊन घेणे असे वैयक्तिक कामं कैद्याकडून कारागृह अधीक्षक करून घेत असल्याची माहिती कारागृहातील सूत्रांकडून मिळाली. दोन दिवसांपूर्वीच कारागृह परिसरातील मोठ मोठ्या झाडांची कत्तल केल्याने गायकवाड वादात सापडले आहे. या प्रकरणाचा विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांकडून आढावा घेण्यात आला. आता यानंतर खासगी गाडी धुवून घेण्याचा प्रकार समोर आला आहे.