'बिकिनी किलर' मुलींना डिनरला बोलावायचा अन् रात्री..., नंतर असं काही करायचा की... (फोटो सौजन्य-X)
Charles Sobhraj real story news in Marathi : एक लेडी किलर म्हणा किंवा ‘बिकिनी किलर‘, त्याची एक नाही तर अनेक नावे आहेत, परंतु त्याचे खरे नाव आहे – चार्ल्स शोभराज. तुम्ही हे नाव ऐकले असेलच? हो, हा तोच शोभराज आहे ज्याला तिहारच्या भिंतीही थांबवू शकल्या नाहीत. या एकट्या गृहस्थांवर सुमारे ४ चित्रपट आणि १ वेब सिरीज बनवण्यात आली आहे. अनेक वेळा लोक चार्ल्सची प्रशंसा करावी की टीका करावी याबद्दल गोंधळून जातात. कोण आहे हा ‘बिकिनी किलर‘ चार्ल्स शोभराज?
चार्ल्सचा जन्म ६ एप्रिल १९४४ रोजी व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरात झाला. त्याचे वडील भारतीय होते आणि आई व्हिएतनामी होती. त्याचे आईवडील विवाहित नव्हते आणि त्याच्या वडिलांनी त्याला बालपणात एकटे सोडले. चार्ल्सचे बालपणात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नंतर तो फ्रान्सला गेला आणि तिथले नागरिकत्व घेतले. त्याने बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले, पण त्याला अभ्यासात रस नव्हता. लहानपणीच तो गुन्हेगारीच्या जगात शिरला आणि हुशारीने पैसे कमवू लागला.
चार्ल्स शोभराज इतका प्रभावशाली होता की तो पहिल्या नजरेतच सर्वांना मूर्ख बनवायचा, त्याच्या बोलण्याच्या पद्धतीपासून ते त्याच्या उंचीपर्यंत. तो गोव्यात बहुतेक गुन्हे करायचा आणि त्याचे लक्ष्य परदेशी मुली असायच्या. तो कोणालाही प्रभावित करू शकत होता आणि म्हणूनच मुली त्याचे सोपे लक्ष्य होत्या. चार्ल्स प्रथम परदेशी मुलींशी मैत्री करायचा, नंतर त्यांना जेवणासाठी आमंत्रण देयाचा. त्यांना नशायुक्त पदार्थ खायला देऊन बेशुद्ध करायचा. त्यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि इतकेच नाही तर तो त्यांच्या मौल्यवान वस्तू घेऊन पळून जायचा. म्हणूनच त्याला ‘बिकिनी किलर‘ असेही म्हटले जायचे. चार्ल्स शोभराजवर १५ ते २० लोकांच्या हत्येचा गुन्हा दाखल होता.
तो नवीन कपडे, बूट, चष्मा आणि परफ्यूम…
तुरुंगात असतानाही तो चार्ल्सला भेटायला येणाऱ्या मुलींना अडकवायचा. ज्या दिवशी एखादी महिला तुरुंगात त्याला भेटायला यायची, त्या दिवशी चार्ल्स नवीन कपडे, बूट, चष्मा आणि परफ्यूम घेऊन तयार असायचा. त्याला या सर्व गोष्टी खूप आवडत असत आणि तुरुंगातील त्याची खोली बूट आणि कपड्यांनी भरलेली असायची, जी त्यावेळी बेकायदेशीर नव्हती. चार्ल्स त्याला भेटायला येणाऱ्या महिलांना त्याची कथा सांगयचा. तो इतका तीव्र परफ्यूम मारायचा की दूर असणाऱ्यांना ही हा दरवळ येयाचा.
१९७२ मध्ये दिल्लीतील अशोका हॉटेलमधील दागिन्यांच्या दुकानातून दागिने चोरताना चार्ल्सला पहिल्यांदाच अटक करण्यात आली. हॉटेलमधील एका नर्तकीला अडकवून त्याने ही चोरी केली होती. पण पळून जाताना तो त्याचा पासपोर्ट खोलीत विसरला ज्यामुळे त्याला नंतर अटक करण्यात आली. दरम्यान पोलीस चार्ल्सला जास्त काळ तिहारमध्ये ठेवू शकले नाहीत आणि पोटदुखीच्या बहाण्याने तो रुग्णालयात दाखल झाला आणि तेथून पळून गेला. यानंतर, १९७६ मध्ये दुसऱ्यांदा, दिल्लीतील एका परदेशी पर्यटकाचा पासपोर्ट हिसकावण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
चार्ल्सचे तिहारमध्ये क वर्गाचे कैदी नोकर म्हणून होते, जे त्याला मालिश करायचे, त्याचे कपडे धुतायचे आणि त्याच्यासाठी जेवणही बनवायचे. त्याचा सेल एका स्टुडिओ अपार्टमेंटपेक्षा कमी नव्हता, ज्यामध्ये बेडव्यतिरिक्त बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्या होत्या. तिहारमध्ये चार्ल्सचा आभास असा होता की लोक त्याला ‘चार्ल्स साहेब’ म्हणायचे.
चार्ल्स शोभराजने दुसऱ्यांदा तिहारमधून पळून जाण्यासाठी वाढदिवसाच्या पार्टीची मदत घेतली. त्याने पार्टीत मिठाई वाटली आणि सैनिकांना ५० रुपयेही दिले. या मिठाईत एक अंमली पदार्थ होता, जो खाल्ल्यानंतर सर्वजण बेशुद्ध झाले आणि तो उच्च सुरक्षा तुरुंगातून पळून गेला. तथापि, २३ दिवसांनी त्याला गोव्यात पुन्हा अटक करण्यात आली. भारत आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये त्याच्यावर डझनभर खूनाचे गुन्हे दाखल आहेत.
१९९७ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर तो फ्रान्सला गेला. २०२२ मध्ये त्याची सुटका झाली. २००३ मध्ये, त्यांच्या नेपाळ भेटीदरम्यान, त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि १९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. २०२२ मध्ये त्यांच्या वृद्धापकाळामुळे त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर चार्ल्सला फ्रान्सला पाठवण्यात आले, जिथे ते अजूनही राहतात. ‘इन्स्पेक्टर मधुकर झेंडे’ यांनी कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराजला दोनदा अटक केली होती.