Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: वाद, मारहाण अन् विकासचा मृत्यू..; बीडमध्ये ट्रकमालकाकडून चालकाची हत्या

विकास आणि क्षीरसागर यांच्यात वाद झाला. या वादानंतर क्षीरसागर यांनी चालकाला डांबून ठेवत मारहाण केली, असा आरोप विकासचा भाऊ आकाश याने केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 16, 2025 | 03:20 PM
Beed Crime: वाद, मारहाण अन् विकासचा मृत्यू..; बीडमध्ये ट्रकमालकाकडून चालकाची हत्या
Follow Us
Close
Follow Us:

बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच, आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात एका ट्रकमालकाने ट्रकचालकाला डांबून ठेवून अमानुष मारहाण केली, ज्यामुळे चालकाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या क्रूर मारहाणीमुळे ट्रकचालकाच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा होऊन ते काळे-निळे पडले होते.या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रकरणाची नोंद घेतली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे एका ट्रकमालकाने चालकाला तब्बल दोन दिवस डांबून ठेवून अमानुष मारहाण केली. या क्रूर मारहाणीत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विकास बनसोडे, राहणार जालना, हा पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर नावाच्या व्यक्तीच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. विकास आणि ट्रकमालक क्षीरसागर यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादानंतर क्षीरसागरने विकासला डांबून ठेवत सतत मारहाण केल्याचा आरोप मृत विकासचा भाऊ आकाश बनसोडे याने केला आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपीवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.

Harshwardhan Sapkal : ‘औरंगजेबाइतकेच देवेंद्र फडणवीस क्रूर शासक’; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. “पुन्हा स्व संतोष देशमुखांसारखीच घटना ? ही माणसं आहेत की जनावरं? आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) विकास बनसोडे या युवकाचा खून आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब शिरसागर यांच्याकडे विकास बनसोडे वय वर्ष 25 , हा जालना तालुक्यातील युवक ट्रक ड्राइवर म्हणून, गेले ४ वर्ष कामाला होता. या युवकाचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्याचे कळताच कडा चौकीला कळवण्यात आले. एक आरोपीला अटक झाली असे सांगण्यात आले. कधी थांबणार हे?”  असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या या घटनेचा सखोल तपास केला जात आहे. याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. चालकावर किती अमानुष मारहाण करण्यात आली, हे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून स्पष्ट दिसत आहे. बीडमध्ये सातत्याने मारहाणीचे व्हिडीओ समोर येत असताना, हा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.

Ratnagiri : बीड प्रकरणावर भाई जगताप यांनी व्यक्त केला तीव्र संताप; म्हणाले…

 अंजली दमानिया यांनी सकाळी या प्रकरणावर भाष्य करत तीव्र नाराजी व्यक्त केली. विकास बनसोडेच्या भावाने काही गंभीर आरोप केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.सातत्याने बीडमध्ये अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. याआधीही धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्या मारहाणीचे धक्कादायक दोन व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि दादा खिंडकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनांमुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: What is really going on in beed truck owner killed truck driver nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Beed Case

संबंधित बातम्या

Crime news updates : परळीत मुंडे गँगची तरुणाला बेदम मारहाण
1

Crime news updates : परळीत मुंडे गँगची तरुणाला बेदम मारहाण

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
2

सरपंच देशमुखांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्यारांचा वापर, अंगावर 150 जखमा; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

वाल्मिक कराड सुटणार? वकिलांनी निर्दोष मुक्तीसाठीचा अर्ज न्यायालयात केला सादर
3

वाल्मिक कराड सुटणार? वकिलांनी निर्दोष मुक्तीसाठीचा अर्ज न्यायालयात केला सादर

Satish Bhosale : ‘खोक्या भाई’चा तुरुंगात शाही पाहुणचार; बिर्याणीचा डब्बा अन्…
4

Satish Bhosale : ‘खोक्या भाई’चा तुरुंगात शाही पाहुणचार; बिर्याणीचा डब्बा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.