Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: भिवंडी गाठली, मिशा कापल्या…; ओळख लपवण्यासाठी सुदर्शन घुलेचे धक्कादायक प्रताप

सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक झाल्यानंतर केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर केज न्यायालयाने या तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2025 | 12:33 PM
Santosh Deshmukh Case: भिवंडी गाठली, मिशा कापल्या…; ओळख लपवण्यासाठी सुदर्शन घुलेचे धक्कादायक प्रताप
Follow Us
Close
Follow Us:

बीड:  बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्याकडून नवी माहिती उघड झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडने 31 डिसेंबर रोजी सीआयडीला सरेंडर केलं होतं. त्यानंतर अनेक दिवासांपासून फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला शुक्रवारी (03 जानेवारी) ताब्यात घेण्यात आले. यानंतर सदर प्रकरणातील विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार झाले. पण कृष्णा आंधळे वगळता आता इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुलेची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन मुंबईनजीकच्या भिंवडीत दाखल झाला. भिवंडीत सामाजिक संस्था चालक सोन्या पाटील यांच्या कार्यालयात गेला. त्याठिकाणी त्याने सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांची भेट घेतली. त्या कंपनीत त्यांच्या गावाताली मुलगा विक्रम डोईफोडे हादेखील काम करतो, हे त्याला माहिती होते. सुदर्शन घुलेने जयवंत पाटील यांच्याकडून विक्रम डोईफोडेंचा पत्ता मिळवला. विक्रम डोईफोडेंचा पत्ता मिळाल्यानंतर तो आणि त्याचे साथीदार वळ पाडा येथील बारवर पोहचले, तिथे त्यांनी विक्रम यांच्याकडे एकदोन दिवस लपण्यासाठी मदत मागितली. पण विक्रम यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी तिथूनही पळ काढला. तिथून त्यांनी थेट गुजरात गाठले.

Union Budget 2025: अर्थसंकल्पात नोकरी करणाऱ्या लोकांना मिळणार मोठा दिलासा? कोणासाठी होऊ शकते मोठी घोषणा? 

सुदर्शन घुलेने ओळख लपवण्यासाठी मिशी कापली

वळपाडा येथे विक्रम डोईफोडे यांच्या हॉटेलवर लपण्यासाठी जागा न मिळाल्याने लघुशंकेला जातो असं सांगून सुदर्शन घुलेने तिथूनही पळ काढला, त्यानंतर तिघांनीही थेट गुजरात गाठलं. या तिघांनीही एका मंदिरात आसरा घेतला. जवळपास 15 दिवस ते त्याच मंदिरात राहिले. धक्कादायक म्हणजे, भिवंडीत आल्यानंतर त्याने ओळख लपवण्यासाठी सुदर्शनने मिशा कापल्या. याचा एक फोटोही समोर आला आहे.

सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक झाल्यानंतर केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर केज न्यायालयाने या तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांची चौकशी झाल्यानंतर, माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी गेवराई पोलीस ठाण्यात आहेत, तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Web Title: Where did sudarshan ghule go after santosh deshmukhs murder what did he do nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • Beed Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.