सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या; कळमनुरीच्या शिवारात गळफास घेऊन संपवलं जीवन
ग्वाल्हेर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणांवरून खून, खुनाचा प्रयत्न आणि आत्महत्या यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच पतीने माहेरी जाण्यास नकार दिल्याच्या रागातून पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. पाचव्या मजल्यावरून उडी घेत तिने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली.
हेदेखील वाचा : शिरवळमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर
महिलेने अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पतीने रक्तबंबाळ झालेल्या पत्नीला रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पतीच्या जबाबाच्या आधारे पोलीस पुढील कारवाई सुरू केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती दिलीप राठोड हा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. 2017 साली दिलीप यांचा विवाह आरती राठौडसोबत झाला होता. दोघांना मुलगी निधी (वय 6) आणि मुलगा विहान (वय 2) अशी दोन मुले आहेत. पती दिलीपने दिलेल्या जबाबानुसार, पत्नी तिच्या माहेरी जाण्यासाठी आग्रह करत होती. मात्र, पतीने पत्नीला माहेरी जाण्यास नकार दिला होता.
नकार दिल्याने राग अनावर
माहेरी जाण्यास नकार दिल्यानंतर संतप्त महिलेला राग अनावर झाला. 23 जानेवारीला महिलेने टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत महिलेने आयुष्य संपवले. आरती उंच इमारतीवरून पडल्यानंतर रक्ताने माखली होती. या घटनेची माहिती मिळताच पतीने घटनास्थळी धाव घेतली, पण उशिरा झाला होता.
पुण्यातील शिरवळ येथे तरुणाची आत्महत्या
शिरवळ येथील इल्जिन ग्लोबल इंडिया कंपनीत काम करणाऱ्या अविनाश अशोक कोडग (वय २८, मूळ रहिवासी, हांगिरगे, ता. सांगोला, जि. सोलापूर) या तरुण अभियंत्याने १० जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूपूर्वी सापडलेल्या चिठ्ठ्यांमध्ये तीन व्यक्तींचा उल्लेख करून त्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.