Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी रणशिंग फुंकले! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना देणार दरमहा १८ हजार रुपये

Delhi Assembly Elections 2025: आम आदमी पार्टीने पुरोहितांसाठी मोठी घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी पुजारी सन्मान योजनेची घोषणा केली आहे, या योजनेअंतर्गत पुजारींना दरमहा 18,000 रुपये मानधन दिले जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 30, 2024 | 02:58 PM
अरविंद केजरीवालांनी रणशिंग फुंकले! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना देणार दरमहा १८ हजार रुपये (फोटो सौजन्य-X)

अरविंद केजरीवालांनी रणशिंग फुंकले! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना देणार दरमहा १८ हजार रुपये (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Delhi Assembly Elections 2025 News In Marathi: 2013 पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या ‘आप’साठी ही 2025 ची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेस पुनरागमनाच्या शोधात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. याचपार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत आम आदमी पार्टीने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. 2013 पासून दिल्लीत सत्तेत असलेल्या ‘आप’साठी ही निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. याचदरम्यान महिलांसाठी दरमहा २१०० रुपये, संजीवनी योजनेंतर्गत ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी मोफत उपचार, वृद्धांसाठी पेन्शन योजना, दिल्लीकरांसाठी २४ तास शुद्ध पाणी आणि पुजारी आणि पुरोहितांना वेतन यांचा समावेश आहे.

केजरीवाल यांच्यासह पक्षाचे अनेक नेते ‘आप’च्या या आश्वासनांना मास्टरस्ट्रोक म्हणत असताना, भाजप या मुद्द्यावरून हल्लाबोल करत आहे. भाजप या आश्वासनांना केजरीवाल यांची निराशा आणि दिल्लीतील जनतेचा विश्वासघात म्हणत आहे. ते म्हणतात की केजरीवाल जनतेला फक्त खोटी आश्वासने देत आहेत, तर सत्य हे आहे की त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! नवीन वर्षात सर्व रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलणार, जारी होणार TAG अन् ट्रेनचे नवीन क्रमांक

केजरीवाल यांच्या प्रत्येक घोषणेवर भाजप हल्ला करत आहे. ‘आप’ने महिला सन्मान आणि संजीवनी योजना जाहीर केल्यावर भाजपने ही मोठी फसवणूक असल्याचे म्हटले आणि ‘आप’ गेली 10 वर्षे सत्तेत आहे, पण त्यांनी एकाही महिलेला 10 रुपयांची मदत दिली नाही. त्यांनी ही योजना यापूर्वीच राबवायला हवी होती. पण आता निवडणुकीपूर्वी ते वृद्ध आणि महिलांना खोटी आश्वासने देत आहेत, जेव्हा ‘आप’ने दिल्लीतील जनतेला स्वच्छ पाण्याचे आश्वासन दिले होते, तेव्हा भाजपने त्याचाही प्रतिवाद केला.

भाजपचे आरोपपत्र जारी केले होते

भारतीय जनता पक्षाने केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाविरुद्ध चाळीस पानी आरोपपत्र जारी केले होते. यामध्ये गंभीर आरोप करण्यात आले. चार्जशीटच्या कव्हर पेजवर ‘दिल्ली सरकार दिवाळखोर, आपचे आमदार श्रीमंत आणि केजरीवाल शीशमहलमध्ये’ असे लिहिले होते. या आरोपपत्रात भाजपने अनेक आरोप केले होते आणि ‘आप’चे प्रत्येक आश्वासन खोटे असल्याचे म्हटले होते.

त्याचवेळी आम आदमी पक्षाने सोमवारी पुजारी आणि पुरोहितांसाठी घोषणा केल्यावर भाजप नेते परवेश वर्मा यांनी केजरीवालांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘मंदिराच्या पुजाऱ्यांना आणि सर्व गुरुद्वारांच्या पुजाऱ्यांनाही वेतन दिले जावे, असे मी वर्षानुवर्षे सांगत आलो आहे, पण केजरीवाल गेल्या 10 वर्षांपासून सर्व मशिदींच्या मौलवींना आणि त्यांच्या साथीदारांना पगार देत आहेत. आता निवडणुका आल्या की त्यांना पुजारी-ग्रंथी आठवतात.

भाजप या आश्वासनांचा मुकाबला कसा करणार?

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप कोणताही जाहीरनामा जारी करण्यात आलेला नाही. तसेच कोणतेही मोठे आश्वासन जाहीर केलेले नाही. मात्र भाजप महिला, वृद्ध आणि तरुणांसाठी काही मोठ्या घोषणाही करू शकते, असे मानले जात आहे. नुकतेच भाजपचे खासदार मनोज तिवारी म्हणाले होते की, ते दिल्लीतील जनतेला ‘आप’च्या आश्वासनापेक्षा 5 पट अधिक देण्यास तयार आहेत.

Todays Gold Price: आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या भावात घसरण; खरेदीपूर्वी वाचा आजचे दर

Web Title: Arvind kejriwal announces pujari granthi samman yojana to provide 18000 monthly to hindu and sikh priests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 02:57 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • delhi

संबंधित बातम्या

Nizamuddin Dargah Roof Collapse :  निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू
1

Nizamuddin Dargah Roof Collapse : निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठी दुर्घटना, हुजराचे छत कोसळले, ५ जणांचा मृत्यू

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
2

‘मांस खाणारे स्वतःला प्राणीप्रेमी…’; भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
3

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Huma Qureshi च्या भावाची हत्या कशी झाली? आरोपी हल्ला करत असतानाचा CCTV फुटेज समोर
4

Huma Qureshi च्या भावाची हत्या कशी झाली? आरोपी हल्ला करत असतानाचा CCTV फुटेज समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.