Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Elections 2025: अमित शाह यांच्या रॅलीत ‘एक हैं तो सेफ है’, ‘बटेंगे तो कटेंगे’चे लागले नारे, ‘आप’मुक्त दिल्ली

गृहमंत्र्यांनी ८ फेब्रुवारी रोजी त्यांनी दिल्ली आपत्तीमुक्त करण्याबद्दल बोलत केजरीवाल सरकारवर टीका केली. शाह म्हणाले की, गेल्या १० वर्षांत दिल्लीतील परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे, कशी झाली रॅली?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 27, 2025 | 06:20 AM
दिल्ली विधानसभा निवडणुकांची धामधूम

दिल्ली विधानसभा निवडणुकांची धामधूम

Follow Us
Follow Us:

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी नरेला येथील रामदेव चौकात एका विशाल जाहीर सभेला संबोधित केले. या जाहीर सभेत मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या, ज्यांनी शाह यांचे मनापासून स्वागत केले. जाहीर सभेदरम्यान, ‘एक हैं तो सेफ है’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणा सतत सर्वांच्या कानात गुंजत होत्या, ज्यावरून भाजप समर्थकांचा उत्साह दिसून येत होता.

५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी सध्या जोरात दिल्लीमध्ये रॅलींचे प्रदर्शन चालू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेता असणाऱ्या अमित शाह यांनी नरेला येथील सभा गाजवली. 

लोकशाहीच्या बळावर गरीब आदिवासी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या

अमित शहा यांनी सभेतील लोकांना संबोधित केले आणि सांगितले की, आज देश ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. ते म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांत आपल्या देशातील लोकशाहीची मुळे पाताळापेक्षाही खोलवर रुजली आहेत. लोकशाहीच्या ताकदीमुळेच एक चहा विक्रेता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि एक गरीब आदिवासी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या, असेही त्यांनी सांगितले.

Delhi Assembly Elections : ‘केंद्र सरकारने शिक्षण आणि आरोग्य बजेट वाढवावे’, मध्यमवर्गीयांसाठी केजरीवाल यांनी केली मोठी मागणी

‘आप’मुक्त दिल्ली

गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले की, डबल इंजिन सरकार विकासाच्या गाथा लिहित आहेत. ८ फेब्रुवारी रोजी त्यांनी दिल्ली आपत्तीमुक्त करण्याबद्दल बोलले आणि केजरीवाल सरकारवर टीका केली. गेल्या १० वर्षांत दिल्लीतील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे आणि आता केजरीवाल यांना हटवण्याची वेळ आली आहे, असे शाह म्हणाले. केजरीवाल यांनी संपूर्ण एक दशक दिल्लीवर आपला जम बसवला होता. तर आता भाजपच्या मते आप-दा-मुक्त दिल्ली करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील लोकांना चांगली सुविधा मिळण्यासाठी सत्ताबदल महत्त्वाचा आहे असाच या रॅलीमध्ये एक कल दिसून आला.

Delhi Assembly Elections: दुसऱ्या राज्यातील पोलीस दिल्लीतील कोणत्याही नेत्याला सुरक्षा देऊ शकतात का? काय सांगतात नियम

दिल्लीतील समस्या

दिल्लीच्या समस्यांबाबत अमित शहा म्हणाले, लोकांना २४ तास स्वच्छ पाणी मिळते का? परिसरातील कचरा वेळेवर उचलला जातो का? ते म्हणाले की, शाळांची स्थितीही चांगली नाही आणि रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव आहे. अमित शाह यांनी दिल्लीतील सर्व परिस्थितीचा आढावा घेत या सभेमध्ये जनतेला आवाहन केले. तसंच गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीची अवस्था वाईट झाल्याचेही सांगितले. तसंच आता ‘आप’मुक्त दिल्ली करण्याची वेळ आली आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी खूपच जोर लावत असल्याचे दिसून येत आहे 

Web Title: Delhi assembly elections 2025 amit shah rally in narela assembly seat bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Amit Shah
  • bhartiya janta party

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
2

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.