Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule on NCP Merger: ‘अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी..’ राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

Supriya Sule on NCP Merger: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटल्या जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2026 | 11:57 AM
अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी...', राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

अजितदादांचे निधन झाले त्या दिवशी...', राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

Follow Us
Follow Us:
  • NCP विलीनीकरणावर शरद पवार गटात चार वेगवेगळी मते
  • चर्चेला आता पूर्णविराम
  • विलीनीकरणावर नेमकं काय  म्हणाल्या?
Supriya Sule on NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचे मोठे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

आमच्यासाठी हा भावनिक विषय

यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, यापूर्वी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. या प्रक्रियेसाठी तारीखही निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे विलीनीकरणाचा विषय केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित नव्हता, तर त्याबाबत काही घडामोडीही सुरू होत्या. मात्र, अजितदादांच्या निधनानंतर या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला. यापुढे विलीनीकरणाबाबत आपल्याला प्रश्न विचारू नयेत, अशी हात जोडून विनंतीही सुप्रिया सुळे यांनी केली. या विषयाकडे केवळ राजकीय चर्चेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे; मात्र आमच्यासाठी हा भावनिक विषय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Gunratna Sadavarte : ‘राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी छटपूजा रोखून दाखवावी’; गुणरत्न सदावर्तेंचा थेट इशारा, छटपूजा वादात नवा ट्विस्ट!

‘तुमच्यासाठी ही चर्चा आहे, आमच्यासाठी ती भावना आहे,’ या शब्दांत त्यांनी या विषयामागील भावनिक बाजू मांडली. राजकारणात अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात असतात. मात्र, प्रत्येक चर्चेला राजकीय अर्थ लावणे योग्य नसल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट होते. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर सध्या तरी पडदा पडल्याचे चित्र आहे. यापूर्वी विलीनीकरणाची तारीख ठरल्याचा त्यांनी केलेला उल्लेखही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची राजकीय वाटचाल कशी राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान शरद पवार गटातच चार वेगवेगळी मते समोर आल्याची माहिती आहे. दोन्ही गटांच्या विलीनीकरणानंतर सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने ज्येष्ठ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. तर काही नेते स्वतंत्र गट म्हणून एनडीएसोबत जाण्याच्या शक्यतेवर विचार करत आहेत. रोहित पवार यांचा सत्तेत जाण्यास विरोध असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, रोहित पाटील यांनी पक्षाचा अंतिम निर्णय स्वीकारणार असल्याची भूमिका मांडली आहे.

NCP विलीनीकरणावर शरद पवार गटात चार वेगवेगळी मते

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अशातच शरद पवार गटात विलीनीकरण आणि सत्तेत सहभागी होण्यावरून एकमत नसल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मुद्द्यावर पक्षात दोन नव्हे, तर चार वेगवेगळे विचारप्रवाह निर्माण झाले आहेत.

ज्येष्ठ आमदारांचा एक गट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलीनीकरण करून सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास राजकीय ताकद वाढू शकते, असे या नेत्यांचे मत असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांच्यासोबत यापूर्वीही विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. या संदर्भात जवळपास १७ बैठका झाल्याची माहिती आहे.

ज्येष्ठ आमदारांचा विलीनीकरणावर भर

सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील अनेक ज्येष्ठ आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचे विलीनीकरण करून सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने आहेत. मात्र, या प्रक्रियेत शरद पवार यांची सक्रिय भूमिका किती महत्त्वाची असेल, याबाबत यापूर्वीही वेगवेगळे मतप्रवाह समोर आले होते. सध्याच्या चर्चांमध्येही सत्तेत जाण्याच्या निर्णयात त्यांची भूमिका काय असेल, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाबाबत काय विधान केले?

    Ans: अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

  • Que: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची तारीख ठरली होती का?

    Ans: होय. यापूर्वी विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती आणि त्यासाठी तारीखही निश्चित झाली होती, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

  • Que: विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारू नयेत, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी का केली?

    Ans: हा विषय केवळ राजकीय चर्चा नसून त्यांच्यासाठी भावनिक असल्याचे सांगत त्यांनी यापुढे विलीनीकरणाबाबत प्रश्न विचारू नयेत, अशी हात जोडून विनंती केली.

Web Title: Supriya sule ends ncp merger discussion ajit pawar death sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah
  • Nationalist Congress Party
  • supriya sule

संबंधित बातम्या

NCP News : ‘समोर दिसलात तर तोंड काळं करू’, कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक! रामदास कदमांच्या प्रतिमेला चपलांनी मारले
1

NCP News : ‘समोर दिसलात तर तोंड काळं करू’, कर्जतमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक! रामदास कदमांच्या प्रतिमेला चपलांनी मारले

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
2

NCP Merger : ‘अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीलाच…’ राष्ट्रवादीचं विलिनीकरणावरून सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
3

NCP Merger : ‘दादा गेले, विषय संपला!’ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा
4

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.