Delhi-NCR Earthquake : राजधानी दिल्लीत मोठा भूकंप; दिल्लीकर साखरझोपेत असतानाच घटना, तीव्रताही जास्त
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये आज पहाटे मोठा भूकंप झाला. या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी दिल्ली अक्षरश: हादरली. हा भूकंप इतका जोरदार होता की, बेडपासून अगदी घरातील खिडकीपर्यंत सर्व काही हादरले होते. अनेक वर्षांनंतर सोमवारी पहाटे दिल्ली-एनसीआरमध्ये इतका मोठा भूकंप जाणवला. भूकंपामुळे काही सेकंद जमीन हादरली. गाढ झोपलेले लोकही भीतीने घराबाहेर पळू लागले.
EQ of M: 4.0, On: 17/02/2025 05:36:55 IST, Lat: 28.59 N, Long: 77.16 E, Depth: 5 Km, Location: New Delhi, Delhi.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/yG6inf3UnK— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 17, 2025
आतापर्यंत या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटे 5.30 च्या सुमारास झाला. जमीन काही सेकंद थरथरत राहिली. त्यामुळे लोकंही घाबरले होते ते घाबरून पळू लागले. झोपलेल्या लोकांना ते जाणवले. घरातल्या वस्तू हलू लागल्या. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली-एनसीआर होता.
दिल्ली-एनसीआरमध्ये हा मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली 5 किलोमीटर होती. भूकंप इतका जोरदार होता की, लोकांना या भूकंपाचे धक्के तीव्रतेने जाणवले. जमिनीच्या आत काही मोठी हालचाल होत असल्याचा भास होत होता. घराच्या भिंती, खिडक्या सगळं काही हालत होतं. सध्या तरी या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले
भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडू लागले. मोठ्या उंच इमारतींमध्ये लोकांना भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. त्यानंतर जवळपास सर्वच लोक लगेच बाहेर पडले. भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटेच जमीन हादरली.
दिल्ली होते भूकंपाचे केंद्रबिंदू
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी होती. त्याचे केंद्र नवी दिल्लीत जमिनीपासून पाच किलोमीटर खोलीवर होते. ते 28.59 अंश उत्तर अक्षांश आणि 77.16 अंश पूर्व रेखांशावर होते. कमी खोली आणि केंद्र दिल्लीत असल्याने दिल्ली-एनसीआरमध्ये जास्त जाणवले. अनेक वर्षानंतर भूकंपाचे केंद्र दिल्ली राहिले आहे. त्यामुळे येथील लोकांना बराच वेळ भूकंपाचे धक्के जाणवले.